Subodh Kerkar: ऑस्ट्रेलियामध्ये समुद्रकिनारी रंगणार 'शिल्पोत्सव’! डॉ. सुबोध केरकर यांना खास आमंत्रण

Subodh Kerkar Australia: शिल्पकार डॉ. सुबोध केरकर यांना ऑस्ट्रेलिया सरकारने ‘समुद्रकिनारी शिल्पोत्सव - कॉटेसलो २०२६’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शिल्पमेळाव्यासाठी विशेष निमंत्रण दिले आहे.
Subodh Kerkar Australia
Subodh Kerkar Australia Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रसिद्ध शिल्पकार डॉ. सुबोध केरकर यांना ऑस्ट्रेलिया सरकारने ‘समुद्रकिनारी शिल्पोत्सव - कॉटेसलो २०२६’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शिल्पमेळाव्यासाठी विशेष निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणानुसार ते येत्या मार्च २०२६ मध्ये पर्थजवळील कॉटेसलो किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर सादरीकरणात्मक शिल्पकृती (नाट्यात्मक कला सादरीकरण) साकारणार आहेत.

हे आमंत्रण पर्यटन पश्चिम ऑस्ट्रेलिया विभागाच्या ‘आमंत्रित परदेशी कलाकार कार्यक्रम’अंतर्गत देण्यात आले असून, केरकर सुमारे १०० ते २०० ऑस्ट्रेलियन नागरिकांसह समुद्रकिनारी सृजनशील कृती सादर करतील.

Subodh Kerkar Australia
Subodh Kerkar : बापरे! निर्बुद्ध कला उद्यानासाठी 9 कोटी!!

या सादरीकरणात फुलं, शंख-शिंपले यांसारख्या नैसर्गिक वस्तूंचा वापर होईल. तसेच पर्थ प्रदेशातील ‘नूंगर’ या स्थानिक आदिवासी समुदायाच्या पारंपरिक पोशाखांवर आधारित रंगभूषाही यामध्ये दिसून येईल. या कृतीतून समुद्राशी असलेले मानवी नाते व संस्कृतीतील एकात्मता अधोरेखित होणार आहे.

Subodh Kerkar Australia
Subodh Bhave Goa: '..माझे गोव्याशी जवळचे नाते'! अभिनेते सुबोध भावेंच्या 'गप्पागोष्टी'; अश्रूंची झाली फुलेच्या आठवणींना दिला उजाळा

समुद्र, लोकसंस्कृती आणि पुराणकथांचा संगम घडवणाऱ्या कलाकृतींसाठी डॉ. केरकर प्रसिद्ध आहेत. भारत, नेदरलँड आणि रशिया या देशांत त्यांनी यापूर्वी सादर केलेल्या कला सादरीकरणांना जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या या कलाकृतींचे दृक्‌चित्रण सामाजिक माध्यमांवर लाखो लोक पाहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com