Goa News : गरिबांसाठी निधी वापरणार : खासदार विरियातो फर्नांडिस

Goa News : गावागावांत सुविधा उभारणार
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

सासष्टी, गोवा हे प्रगतिशील छोटे राज्य असले तरी काही गाव अजूनही असे आहेत, जेथे बस सेवा नाही, पिण्याचे पाणी नाही, शाळा नाहीत. या मूलभूत साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व गोरगरीब जनतेच्‍या कल्‍याणासाठी आपण खासदार निधीचा प्राधान्‍याने वापर करणार आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी खासदार झाल्यावर पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आज फर्नांडिस यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू (आयएएस) यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. खासदार निधीचा वापर, त्याचप्रमाणे खासदार व जिल्हाधिकारी मिळून जनसेवा कशी करता येईल या विषयांवर मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, असे फर्नांडिस यांनी सांगितले.

खासदार निधीतून ज्या साधनसुविधा उपलब्ध केल्या जातील, त्यांची देखरेख करण्यासाठी पंचायत, नगरपालिका यासारख्या स्थानिक संस्थांना अधिकार देणे व त्यांना त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे यावरही चर्चा झाली. खासदार म्हणून केवळ कचेरीत बसून राहणाऱ्यांपैकी मी नाही. गावागावांत जाऊन लोकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्‍‍न व समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही ते म्‍हणाले.

सध्‍या गोव्यात जे विविध प्रकल्प सुरू आहेत, ते जनतेच्‍या हिताचे नाहीत. भाजप सरकार गोव्याचे पर्यावरण सांभाळण्यास अपयशी ठरले आहे. कोळसा वाहतूक, तम्‍नार प्रकल्‍प, सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण, मुरगाव पोर्ट ट्रस्टचे मुरगाव पोर्ट ऑथोरिटीमध्ये रूपांतर हे विषय आपल्‍या निशाण्‍यावर असतील, असेही फर्नांडिस म्‍हणाले.

बाणावलीचा प्रश्‍‍न सामंजस्‍याने सोडवावा

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीत जे मतभेद सुरू आहेत, ते सलोख्याने सोडवायला हवे होते. चर्चेने हा प्रश्र्न सोडवता आला असता, असे मत कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी व्‍यक्त केले. उमेदवारीवरून घोळ झाला तेव्हा मी नवी दिल्लीत होतो. अजूनही वेळ गेलेली नाही. हा प्रश्‍‍न सलोख्याने सोडविला जाईल, असा विश्‍‍वासही त्‍यांनी व्‍यक्त केला.

सुडाचे राजकारण करणार नाही

सुडाच्या राजकारणावर माझा विश्‍‍वास नाही. ज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांच्यासह संपूर्ण गोव्याचा मी आवाज होईन. देवाच्या आशीर्वादामुळेच मी आज खासदार होऊ शकलो. केंद्रात गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, असे कॅ. विरियातो यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाद्वारे असे स्‍पष्‍ट झाले आहे की, पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष २७ आणि घटक पक्षांसह एकूण ३० जागा जिंकेल, असा विश्‍‍वासही त्‍यांनी व्‍यक्त केला. दिल्लीतून गोव्यात परतल्यानंतर दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते.

Goa
Goa Industries: औद्योगिक वसाहतींना वीज खात्‍याचा ‘शॉक’, महिना 40 तास बत्ती गुल; उद्योजकांनी व्यक्त केली चिंता

बाणावलीचा प्रश्‍‍न सामंजस्‍याने सोडवावा

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीत जे मतभेद सुरू आहेत, ते सलोख्याने सोडवायला हवे होते. चर्चेने हा प्रश्र्न सोडवता आला असता, असे मत कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी व्‍यक्त केले. उमेदवारीवरून घोळ झाला तेव्हा मी नवी दिल्लीत होतो. अजूनही वेळ गेलेली नाही. हा प्रश्‍‍न सलोख्याने सोडविला जाईल, असा विश्‍‍वासही त्‍यांनी व्‍यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com