Cashew Farmer : काजू उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण बनविणार; दिव्या राणे यांची घोषणा

Cashew Farmer : आमदार गणेश गावकर, दाजी साळकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक उमाकांत, मुख्य वनसंरक्षक प्रवीणकुमार राघव, व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार परब, सरव्यवस्थापक अमर हेबळेकर आणि मान्यवर उपस्थित होते.
MLA Deviya Rane
MLA Deviya RaneDainik Gomantak

Cashew Farmer :

पणजी, काजू हे गोमंतकीयांसाठी केवळ फळ नाही, तर ते उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. काजू ग्रामीण गोव्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देतो; परंतु मागील काही वर्षांत काजू उत्पादनात सातत्याने घट होत आहे.

गोव्याला काजू उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.

त्या ‘काजू फेस्ट २०२४’च्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे,

आमदार गणेश गावकर, दाजी साळकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक उमाकांत, मुख्य वनसंरक्षक प्रवीणकुमार राघव, व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार परब, सरव्यवस्थापक अमर हेबळेकर आणि मान्यवर उपस्थित होते.

राणे म्हणाल्या, गोव्यात काजूचे उत्पादनात घट होऊन आम्ही आता देशातील सातव्या क्रमांकाचे उत्पादक आहोत. आम्ही किमान येत्या काही वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यंदा काजू उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळणे गरजेचे आहे.

गोव्यातील जमीन, डोंगरांवर अनेकांची वक्रदृष्टी आहे. आमच्या पूर्वजांनी दिलेली ही नैसर्गिक देणगी सांभाळून ठेवूया. अनेक ठिकाणी वन खात्याच्या जमिनी लीजवर घेऊन तेथे कष्टकऱ्यांनी काजू उत्पादन घेतले आहे. त्याही लीजांचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. काजू पिकविणाऱ्यांचा या महोत्सवात सन्मान व्हावा, तसेच तरुणाईनेदेखील काजूचे पीक घेणे गरजेचे असल्याचे मंत्री गोविंद गावडे म्हणाले.

हमीभावाबाबत तूर्त भ्रमनिरास

राज्यातील काजू उत्पादनात यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली असून ‘काजू फेस्ट’मध्ये हमीभावाबाबत घोषणा होईल, अशी अनेकांची अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. राज्यात आचारसंहिता लागू असल्याने सरकारी यंत्रणेला घोषणा करता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याचे बोलले जात आहे.

MLA Deviya Rane
Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

सेल्वन ब्रॅण्डचे अनावरण

गोवा वनविकास महामंडळाद्वारे जंगलात नैसर्गिकरित्या मिळणारी उत्पादने उदा. मध, मिरी, काजू तसेच इतर पदार्थ त्याबरोबरच इको टुरिझम, जंगल सफारी असे उपक्रम राबविण्यासाठी सेल्वन ब्रॅण्डचे अनावरण करण्यात आले असून या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com