Goa Rain Alert: गोव्यात 2 दिवस 'यलो अलर्ट', पेडण्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

Goa Weather Update: राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा आणि अचानक पडणाऱ्या पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरन्यान, हवामान खात्याने (IMD) गोव्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
Goa Rain Alert
Goa Rain AlertDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि अचानक पडणाऱ्या पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता, भारतीय हवामान विभागानं (IMD) गोव्यासाठी १२ मे ते १४ मे २०२५ या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, या कालावधीत राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

Goa Rain Alert
Goa Tourism: मोकळे किनारे, हॉटेल बुकिंग्ज रद्द! भारत-पाक संघर्षाचा गोव्याच्या पर्यटनाला फटका

दरम्यान, आज (१२ मे) पेडणे तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी उन्हाने उकाडा जाणवत असतानाच अचानक काळे ढग दाटून आले आणि काही मिनिटांतच जोरदार सरी कोसळल्या. यामुळे तापमानात काहीशी घट झाली असली, तरी हवामानातील अस्थिरता नागरिकांना अधिकच त्रासदायक ठरत आहे.

सतत बदलणाऱ्या हवामानामुळे गोमंतकीय नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Goa Rain Alert
Goa Mining: बेकायदेशीर चिरेखाणींच्या पुनर्संचयनाची माहिती द्या! खंडपीठाचे निर्देश; सरकारला 4 आठवड्यांची मुदत

अवकाळी पावसामुळे बागायतदारांनाही मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. खास करून फळबागा, भाजीपाला आणि फुलझाडांच्या लागवडीवर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com