Goa waterfalls : सत्तरी तालुक्यातील धबधबे फुल्ल, पर्यटकांकडून शुल्क आकारण्याची मागणी

पालीतील शिवलिंग, नगरगावातील ‘चिदंबरम’चे भाग्‍य उजळणार
Goa waterfalls
Goa waterfallsDainik Gomantak
Published on
Updated on

सपना सामंत

Sattari Waterfalls: सत्तरी तालुक्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. वर्षाचे बाराही महिने हिरवा शालू नेसून धरती सजलेली असते. पावसाळ्‍यात तर तालुक्‍यात पर्यटनाला उधाण आलेले असते. त्‍यामुळे आता पर्यटकांचा ओढा सत्तरीकडे वळू लागला आहे. यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे धबधबे वाहण्यास विलंब झाला. मात्र आता पावसाने जोर धरल्‍यामुळे धबधबे पर्यटकांनी फुलू लागले आहेत.

गोमंतकीयांबरोबरच शेजारच्‍या राज्‍यांतील पर्यटक मोठ्या संख्‍येने दाखल होऊ लागले आहेत. सत्तरीत सालेली, झर्मे, नानेली, ब्रह्माकरमळी, शेळप-बुद्रुक, चोर्लाघाट, पाली, हिवरे, शेळप, साट्रे, कुमठळ, करंजोळ, तुळसकोंड, मोले, रिवे, चरावणे यांसह अनेक छोटे-मोठे धबधबे आहेत. साट्रे येथील धबधबा तर बारामाही वाहत असतो.

Goa waterfalls
Goa Monsoon 2023 : बोगमाळोत कोसळली दरड, फोंड्यात निखळले प्लास्टर; मुसळधार पावसाचा परिणाम

वरील धबधबे वाळपई शहरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहेत. यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया, गोवा पर्यटन खाते तसेच इतर संस्थांतर्फे पावसाळ्‍यात तेथे ट्रेकिंगचे आयोजन केले जाते. मात्र साधनसुविधा नसल्‍याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याचाच विचार करून वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी सत्तरीतील पाली येथील शिवलिंग धबधबा व नगरगाव पंचायत क्षेत्रातील आंबेडे येथील चिदंबरम धबधब्याचा पर्यटकदृष्ट्या विकास करण्याचा विचार सुरू केला आहे. ही पर्यटकांनसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.

Goa waterfalls
Goa News - गणेशोत्सवासाठी यंदा जादा गाड्या | Gomantak TV

पर्यटकांना शुल्‍क आकारा

धबधब्‍यावर येणाऱ्या पर्यटकांना शुल्‍क आकारणे गरजेचे आहे. कारण कोणीही कोठूनही येऊन मनमानी कारभार करतो. जर शुल्क आकारणे सुरू केले तर स्‍थानिक पंचायतीला काही प्रमाणात निधी मिळू शकतो. त्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना आखणे गरजेचे आहे, असे स्‍थानिकांचे मत आहे. तसेच तेथे कचऱ्याकुंड्या ठेवल्‍या पाहिजेत.

Goa waterfalls
Goa Government : वंध्यत्वाला तोंड देणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’; गोवा सरकार करणार मोफत उपचार

‘तो’ रस्ता उपयोगी

पाली येथे नव्याने रस्ता झाल्याने पाली ते जांभळीचे तेंबमार्गे चोर्लाघाटावर जाण्यासाठी पर्यटकांना सोयीचे बनले आहे. पावसाळ्यात चोर्ला, सुर्ला भागातील वातावरणही आल्‍हाददायक असते. हा रस्ता पूर्ण झाल्यामुळे आता बेळगावला जाण्यासाठी फोंडा, गुळेली, वाळपई भागातील लोक याच मार्गाचा वापर करू लागले आहेत.

Goa waterfalls
Goa Monsoon 2023 : बोगमाळोत कोसळली दरड, फोंड्यात निखळले प्लास्टर; मुसळधार पावसाचा परिणाम

गेल्या काही दिवासांपासून सत्तरीतील धबधब्यांवर पर्यटकांचा ओढा वाढत आहे. ही चांगली गोष्ट असली तरी काही पर्यटक मनमानी आणि बेशिस्‍त वागतात. त्‍यास आळा घालण्याची गरज आहे. काही जण तर मद्यधुंद अवस्‍थेत असतात. त्‍यामुळे अन्‍य पर्यटकांना विनाकारण मन:स्‍ताप सहन करावा लागतो.अशा पर्यटकांवर कडक कारवाई केली पाहिजे.

विजय सावंत, पाली-सत्तरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com