Goa Vegetable Price Hike : टोमॅटोसह भाजीपाल्याची दरवाढ; या कारणामुळे वाढताहेत दर

बेळगावातही आवक घटली
Goa news
Goa news Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : गोव्यात आणि कोकण किनारपट्टीत मुसळधार वृष्टी होत असली तरी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात अद्याप पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. त्यामुळे भाजीपाला व टोमॅटो उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पाऊस पडणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

त्यामुळे बेळगाव बाजारात अपेक्षेनुरूप टोमॅटोसह भाजीपाल्याची आवक झाली नाही. तर आणखी तीन महिने तरी सध्या मार्केटमध्ये असलेले भाजीपाल्याचे व टोमॅटोचे दर घटणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.पणजी मनपा मार्केटमधील खुल्या स्वरुपात भाजीपाला विक्रेत्यांकडे सध्या टोमॅटो ८० ते १०० विकला जात आहे.

घाऊक व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करीत असला तरी मागणी पाहून ते त्या मालाचा दर किरकोळ बाजारात वाढवतात. गोव्यात ग्राहकांच्या हाती जाईपर्यंत टोमॅटो शंभर रुपये होतो,असे एका विक्रेत्याने सांगितले.

Goa news
Panaji GIS Survey: मालमत्ता कर चुकवणाऱ्यांना बसणार आळा; पणजीतील वास्तुंचे होणार GIS सर्व्हेक्षण

टोमॅटो पीक धोक्यात !

चांगल्या आणि उच्च दर्जाच्या टोमॅटोसाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाभागातील काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने टोमॅटोचे पीक धोक्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादनावर परिणाम झाल्यास बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात येईल. गोव्यात जो काही भाजीपाला येतो तो घाऊक व्यापाऱ्यांकडून येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com