Bicholim News : ‘वेदांता’साठी पुन्हा जनसुनावणी घ्या! पर्यावरणप्रेमी

Bicholim News : डिचोली ब्लॉकअंतर्गत नियमबाह्य काम सुरू असल्याचा दावा
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोली, मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या डिचोली मायनिंग ब्लॉकअंतर्गत ‘वेदांता’च्या (सेसा) खाणीचे भवितव्य अनिश्चित आहे.

ही खाण अटींची पूर्तता न करताच सुरू केली आहे. पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवालातील खोटी माहिती आणि पर्यावरण दाखल्यातील (ईसी) अटींची पूर्तता करण्यात असमर्थ ठरल्याने ही खाण आज ना उद्या बंद पडेल, असा दावा पर्यावरणप्रेमी रमेश गावस आणि इतरांनी केला आहे.

'वेदांता खाणीसाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये घेतलेल्या जनसुनावणीत मांडलेल्या मुद्यांना बगल देऊन खाणीसाठी ईसी दिला आहे, असा दावाही पर्यावरणप्रेमींनी केला. खाण सुरूच करायची असल्यास पुन्हा जनसुनावणी घ्या, अशी मागणी केली.

Bicholim
Goa Politics: राहुल गांधी तुम्हीच सांगा! विरियातोच्या संविधानाबाबत वक्तव्यवरुन विनोद तावडेंची मागणी

खनिज वाहतुकीसाठी रस्ताच नाही

खाणीच्या कारभारातून एक मोठा घोटाळा समोर येणार आहे, असा गौप्यस्फोट खाणविरोधी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सरकारच्या मान्यतेनंतर डिचोलीत वेदांताच्या खाणीवर उत्खनन सुरू झाले. मात्र, खनिज वाहतुकीस रस्ताच नसल्याने कंपनीपुढे पेच आहे.

रस्त्यासाठी कंपनीने खाण खात्याला निवेदनही दिले. पण खाणीचे भवितव्य अस्पष्ट आहे, असा दावाही करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com