वाळपईत रात्रीस खेळ चाले! पाळीव कुत्र्यांची विष घालून होतेय हत्या; काय आहे हे प्रकरण? वाचा...

Goa Crime News: वाळपई नगरपालीका क्षेत्रातील प्रभाग 3 मध्ये बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: गोव्यात गुन्हेगारीचे प्रकार काही नवीन नाहीत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून बेकायदेशीर आणि अवैध कृत्ये करण्यासाठी जर मुक्या जीवांची हत्या होत असेल तर? काहीसा हाच प्रकार उत्तर गोव्यातील वाळपई येथे घडला असून स्थानिकांनी पाळलेल्या कुत्र्यांचे हकनाक बळी जात आहेत.

वाळपई नगरपालीका क्षेत्रातील प्रभाग 3 मध्ये ख्रिश्चन वस्तीत असलेल्या टेलिफोन एचेंज तसेच पोस्ट ऑफिस भागात रात्रीच्या वेळी बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

परिसरात बिअरच्या बाटल्या, सिगारेट, ड्रग्ज ची पाकिटं, चिप्सचे कागद तसेच खाद्यपदार्थांचे रिकामे कंटेनर आदीचा कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला असून हे कृत्य गावाबाहेरील व्यक्तींचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

तसेच अनेकजण या ठिकाणी काळोखाचा फायदा घेत अनैतिक कृत्ये करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी या वस्तीतील वीज पुरवठा सुध्दा जाणुन बुजून बंद केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

मागील काही दिवसांपासून हे प्रकार सातत्याने होत असून काही आठवड्यांपासून येथील स्थानिकांचे पाळीव कुत्रे दिवसागणिक मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

या सर्व प्रकारामुळे स्थानिक आक्रमक बनले असून मृत्युमुखी पडलेले कुत्रे हे विष घातल्यानेच मरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Goa Crime News
Lok Sabha Election 2024: मतपत्रिकेद्वारे निवडणूका घ्या! पणजीत EVM विरोधी आंदोलन; परिसरात तणावाचे वातावरण

या लोकवस्तीतील पाळीव कुत्रे असल्याने जे मोजमजा करण्यासाठी येतात त्यांना कुत्रे हुसकावून लावतात, त्यांच्या अंगावर धावून जातात. कुत्र्यांचा त्रास होत असल्याने सतत कुत्र्यांना विष घालुन मारण्याचा प्रकार होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

रविवार (03 मार्च) रात्री जेस्ली रेबीरो यांच्या पाळीव कुत्र्याला विष घालून मारण्यात आले. या घटनेनंतर त्यांनी वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाने यासंबंधी तातडीने लक्ष घालून या प्रकाराला आळा घालावा अशी आर्त विनवणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com