Goa Agriculture: मूळ कोल्हापुर येथील हलगौडा पाटील कुटुंबीय गोव्यातील शिगावातच ते स्थायिक झालेले आहेत.जेव्हापासून आम्ही कुळे शिगाव पंचायतक्षेत्रात स्थायिक झाले तेव्हापासून आम्ही उसाची लागवड करायचो. पण पाटील कुटुंबीयांनी सध्या आत्मनिर्भरतेसाठी हळदीच्या लागवडीवर भर दिला आहे.
पाटील म्हणाले, संजीवनी साखर कारखान्यात आम्ही ऊस घालायचो, एक लाख चौ.मी. जागेत आम्ही उसाची लागवड करायचो, कारखाना बंद झाल्यापासून आम्ही उसाची लागवड कमी केली. पाच एकरात हळदीचे पीक घेण्याचे ठरविले. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात जाऊन हळद लागवड कशी करावी, याची पाहणी केली आणि तिथूनच बियाणे आणले.
पाच एकर जमिनीत चार क्विंटल बियाणे आम्हाला लागलेले असून योग्य प्रकारे मशागत करून आम्ही ती हळदीचे पीक लावलेले आहे. साधारण जून महिन्यात आम्ही ते हळदीचे बियाणे पेरले आहे आठ ते दहा महिन्यात हळद तयार होणार आहे.
पाच एकरात हळद लावण्यासाठी आम्हाला एक ते दोन लाख खर्च आला.आधी जमिनीची आम्ही मशागत करून घेतली त्यानंतर शेणखते वगैरे टाकून ट्रॅक्टरच्या साह्याने सऱ्या सोडून आम्ही त्यात हळदीची लागवड केलेली आहे.
एक दोन महिन्यात हळदीचे पीक तयार होणार असल्याने त्याला योग्य बाजारपेठ कुठे मिळेल, त्या यादृष्टीने अभ्यास सुरू आहे. हळद लागवड करायची ठरवले होते, तेव्हा धारबंदोडा कृषी खात्याला कळविले होते.
पाच एकरात हळद तर दीड एकरात आल्याची लागवड केल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली, असे प्रभुराज पाटील यांनी सांगितले
बालपणापासूनच शेतीची आवड
आम्ही दोघे भाऊ एक बहीण आमचे सर्वांचे शिक्षण बालवाडी ते हायस्कूल पर्यंत गोव्यातच झालेले आहे. शिक्षण घेत असताना आम्ही वडिलांबरोबर शेती व्यवसायात रमायचे तेव्हापासून शेतीचा अनुभव घेतला आहे.
"वडिलोपार्जित जी जमीन आहे ती पडीक न ठेवता काही ना काही आंतरपीक घ्यावे तेणेकरून आपले आर्थिक सुधारेल व स्वत:आत्मनिर्भर व्हाल.सरकारी नोकरीची आशा न बाळगता आपण आपापली जमीन कसावी. शेतीत कोणतीही लागवड करताना त्याचा योग्य अभ्यास करावा."
- प्रभुराज पाटील, शेतकरी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.