गोवा मंत्रिमंडळात बदल होणारच! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुन्हा केले सूचक विधान; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News Live Updates: गोव्यात दिवसभर घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा.
Goa Today's News Live: गोवा मंत्रिमंडळात बदल होणारच, मुख्यमंत्री सावंत यांनी पुन्हा दिले संकेत
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

आमदारांना पळवणे ही आमची Skill !

आमदारांना पळवणे ही आमची Skill. शेवटी सत्तेत राहणं हे महत्वाचं. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांचे प्रतिपादन.

पैशाअभावी कोणतीच योजना रखडलेली नाही!

राज्यात पैशाअभावी कोणतीच योजना रखडलेली नाही. मागील ४ महिन्यात एकदाही कर्ज घेण्यात आलेले नाही. Procedure Delay झाल्याने लाडली लक्ष्मीचे अर्ज प्रलंबित उरतात त्याबाबतही निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांची माहिती.

मरिना प्रकल्प गरजेचाच, मुख्यमंत्री सावंत

नावशीतील प्रस्तावित मरिना प्रकल्प हा अत्यंत गरजेचा. ह्या प्रकल्पामुळे गोवेकरांना रोजगाराच्या अनेक संधी. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांचे प्रतिपादन.

गोवा मंत्रिमंडळात बदल होणारच, मुख्यमंत्री सावंत यांनी पुन्हा दिले संकेत

कोणत्याही सरकारचा कार्यकाळ मध्यावर पोहोचला की त्याचा Review करणे गरजेचे. मंत्रिमंडळ बदलांच्या चर्चांवर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांचे सूचक विधान.

Goa CM Dr. Pramod Sawant Exclusive Interview: काँग्रेस काळात फक्त आणि फक्त लूट! मुख्यमंत्री सावंत

२००७ ते २०१२ हा कॉंग्रेसच्या कार्यकाळाची आमच्या ह्या १० वर्षांच्या कार्यकाळाशी तुलना करा. कॉंग्रेसने आणि त्यांच्या मंत्र्यांनी अक्षरक्षा लूट चालविली होती. 'सडेतोड नायक'मध्ये मुख्यमंत्र्यांची टीका.

डिचोलीत कचरा व्यवस्थापन महामंडळाचा कोणताही प्रकल्प नाही

डिचोलीत कचरा व्यवस्थापन महामंडळाचा कोणताही प्रकल्प नाही. कुडचिरे, डिचोलीतील स्थानिकांनी केलेला विरोध हा स्थानिक अधिकारी किंवा पालिकेचा असण्याची शक्यता. बाबूश मोन्सेरात यांची माहिती.

कोणीतरी लोकांची दिशाभूल केलीय; आमदार प्रेमेंद्र शेट

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी कुडचिरे इथे भेट देऊन लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कुडचिरेतील या प्रस्तावित प्रकल्पाविषयी या भागात कचरा प्रकल्प होणार असे सांगून कोणी तरी लोकांची दिशाभूल केली आहे असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले. लोकांनी उगाच गैरसमज करून घेऊ नये असंही त्यांच म्हणणं.

हणजूणे ध्वनी प्रदूषण उल्लंघनावर राहणार आता पोलिसांचा वॉच, तीन पथकं स्थापन

हणजूणे येथील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार. ही पथके ध्वनी प्रदूषण होत असलेल्या जागेवर गस्त घालणार. स्थानिक पोलिसांना तक्रार मिळाल्यावर अर्ध्या तासात कारवाई करणे बंधनकारक. प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील ध्वनी प्रदूषणावर नजर ठेवून असेल. जनरल ॲड. देविदास पांगम यांची माहिती.

चतुर्थीपूर्वी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; मुख्यमंत्री सावंत

मुसळधार पावसामुळे पिकांचे भरपूर नुकसान. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार गणेश चतुर्थीपूर्वी मिळणार भरपाई. कृषी कार्ड नसलेल्या शेतकरी देखील भरपाईसाठी पात्र. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.

धारबांदोडा तामसडो येथील अंगणवाडी सरकारी प्राथमिक विद्यालयात स्थलांतर करण्याचा शिक्षण खात्याचा आदेश

धारबांदोडा तामसडो येथील अंगणवाडी सरकारी प्राथमिक विद्यालयात स्थलांतर करण्याचा शिक्षण खात्याचा आदेश. अंगणवाडी विध्यार्थ्यांच्या पालकांनी मानले शिक्षण खात्याचे आभार. पावसाचे पाणी तुंबून राहिल्यामुळे विद्यार्थ्यांची होणार गैरसोय लक्षात घेऊन शिक्षण खात्याने अंगणावाडी स्थलांतरीत करण्याचा घेतला निर्णय.

waste treatment plant Curchirem: कचरा व्यवस्थापन प्रकल्पावरुन कुडचिरेत तणाव; पोलीस - नागरिकांत झटापट

कचरा व्यवस्थापन प्रकल्पावरुन कुडचिरेत तणाव. सरकारचा नियोजित प्रकल्प नकोच. कुडचिरेतील लोकांचा पवित्रा. पोलीस बंदोबस्तात प्रकल्प होऊ घातलेल्या जमिनीचे सर्वेक्षण. पोलीस आणि लोकांची झटापट.

फातोर्ड्यात अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकास अटक

फातोर्डा येथील सिटी कॅफेजवळ अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून धिरज डेव्हिड रॉड्रिग्स याला अटक. तसेच त्याच्याकडून 2 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त.

Traffic: ओल्ड गोवा बायपास मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, रोड जॅमपॅक

ओल्ड गोवा बायपास मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून, रोड पूर्णत: जॅमपॅक झाला आहे. अनेक वाहने माघारी परतून एकेरी मार्गाचा पर्याय निवडत आहेत.

SCIC आणि SIC निवड समितीची आज बैठक

राज्य मुख्य माहिती आयुक्त (SCIC) आणि राज्य निवडणूक आयुक्त (SIC) निवड समितीची आज (गुरुवारी) बैठक. या निवड समितीचे मुख्यमंत्री अध्यक्ष तर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि मंत्री सुभाष शिरोडकर सदस्य आहेत.

Margao: मडगाव पोलिसांकडून एकाच क्रमांकाच्या दोन रेंट-अ-बाईक जप्त

मडगाव पोलिसांकडून एकाच क्रमांकाच्या दोन रेंट-अ-बाईक जप्त. पोलिसांनी GA 08 V 0991 हा एक्रच क्रमांक असलेल्या दोन बाईक जप्त केल्या आहेत. अधिक तपास सुरु.

Goa Accident: पिले - धारबांदोडा येथे चारचाकी - दुचाकीचा अपघात, एकजण जखमी

संजीवनी साखर कारखान्याजवळ चारचाकी आणि दुचाकीचा अपघात. एकजण जखमी झाल्याची माहिती. पायाला दुखापत झालेल्या व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com