Goa News: अपघात, चोरी यासह गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Goa Today's 27 July 2024 Breaking News: मान्सून अपडेट, क्रीडा, राजकारण, कला - संस्कृती यासह राज्यातील ठळक बातम्या.
Goa News: अपघात, चोरी यासह गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
Goa Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

तर गोवा आज संपला असता केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू

काँग्रेस गोव्यात सत्तेत असता तर गोव्याची पूर्ण वाट लागली असती. गोवा पूर्णतः संपला असता. गोव्यात काँग्रेस पक्षाने फक्त सत्तेत राहुन स्वतःचे खिसे भरायचे काम केलं, अशी टीका केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. ते आज गोव्यात केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलत होते.

Goa News: अपघात, चोरी यासह गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
NITI आयोगाच्या बैठकीत CM सावंतांनी गायले 'सनबर्न'चे गोडवे, म्हणाले, 'महोत्सवामुळे गोवा जागतिक नकाशावर'

Kiren Rijiju In Goa: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू गोव्यात दाखल

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू गोव्यात दाखल. राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून स्वागत. रिजिजू गोव्यात केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधतील. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी देखील ते संवाद साधणार आहेत.

Margao Court: मडगाव न्‍यायालयाच्या चार सहाय्‍यक सरकारी वकीलांना वरिष्‍ठपदी बढती

मडगाव न्‍यायालयाचे सहाय्‍यक सरकारी वकील ज्‍योतीन ठक्‍कर यांच्‍यासह स्‍वाती स्‍वप्‍नील परब गावकर, शिवराम पाटील आणि कोलमन रॉड्रीगीस या चार सहाय्‍यक सरकारी वकिलांना वरिष्‍ठ सरकारी वकील म्‍हणून बढती. गृह खात्‍याचे अवर सचिव मंथन नाईक यांच्याकडून आदेश जारी.

मलेरिया आणि डेंग्यूसंबधित चर्चेला आरोग्य अधिकाऱ्यांची दांडी

आज सकाळी हळदोणा मतदार संघातील मलेरिया आणि डेंग्यूची पैदास रोखण्यासाठी आरोग्य अधिकारी विद्या परब यांच्याशी चर्चा आयोजित केली होती. ही बैठक मतदार संघाचे माजी आमदार ग्लेन टिकलो आणि परिसरातील ग्रामपंचायतच्या पंचांनी आयोजित केली होती.

या चर्चेला सर्वजण आले तरी हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी विद्या परब अनुपस्थित होत्या. यामुळे नागरिकांमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या पंचांमध्ये नाराजी निर्माण झाली.

Theft In House: रुमडामळ येथे चोरी, पोलिस तपास सुरु

रुमडामळ गृहनिर्माण मंडळातील श्याम चोडणकर यांच्या घरात चोरी. घरात कोणी नसताना चोरट्यांनी साधली संधी. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले असून, नक्की काय चोरी झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांत तक्रार दाखल, तपास सुरु.

Goa Accident: वेर्णा येथे अपघातात 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

वेर्णा येथे कार अपघातात ज्युलियस फर्नांडिस (18, रा. लोटली, सासष्टी) या तरुणाचा मृत्यू. कारचा चक्काचूर.

Cipla Company Issue: कामगारांना न्याय द्या! सिप्लाच्या कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

सिप्ला कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पणजीतील आझाद मैदानावर निषेध आंदोलन. गेल्या दोन वर्षापासून कंपनीकडून सतावणूक होत असल्याचा आरोप. पूर्वकल्पना न देता कर्मचाऱ्यांची आसाम, सिक्कीम सारख्या ठिकाणी बदली. हे प्रकार थांबवण्याची मागणी.

घोगळ, मडगाव बायपास मार्गावर अपघात, कोणीही जखमी नाही

घोगळ, मडगाव मार्गावर चारचाकीचा अपघात. भोसले सर्कल येथे सकाळी हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

निती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर

निती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. शनिवार आणि रविवारी मुख्यमंत्री दिल्लीत असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com