मुख्य रस्ता आस्कावाडा मांद्रे ते हरमल येथील रस्त्यावरील खड्डे संबंधित पीड्ब्ल्यूडी खात्याने येत्या तीन दिवसात बुजवले नाही तर रस्ता रोको आंदोलन करणार. मांद्रे ग्रामसभेत सरपंच प्रशांत नाईक तसेच ग्रामस्थ आक्रमक. बेकायदेशीर डोंगर कापणी, गटार, रस्ते, जमीन कन्व्हेन्शन अनेक विषयांवर चर्चा.
मेरशी सर्कल जवळ पणजी -फोंडा हायवेवर परप्रांतीयांकडून फळ विक्री. याठिकाणी अशाप्रकारे रस्त्यावरच वाहने उभी केल्याने अपघाताची शक्यता. चलन देण्यास व्यस्त असलेल्या वाहतूक पोलिसांचे या परप्रांतीयांकडे मात्र दुर्लक्ष.
वाळपई, ठाणे मार्गावरील मुख्य रस्त्यावर पाण्याच्या चेंबरला गळतीचा अंदाज न आल्याने एका महिलेचा अपघात झाला होता. तातडीने दुरुस्ती करण्याचे वृत्त गोमंतक टीव्हीने दिल्यानंतर आज रविवारी पाणी पुरवठा खात्यातर्फे चेंबरच्या दुरुस्तीचे काम सुरु.
विजय सरदेसाई हे मनाने Congressmen आणि वरिष्ठ विरोधी नेते आहेत. लोकसभेतील आणि विधानसभा अधिवेशनातील त्यांची कामगिरी हे त्याचे उदाहरण आहे. सरदेसाईंचा 'Sunday Dialouges' हुकूमशाही आणि भ्रष्ट भाजपला हरवण्यासाठी इंडिया आघाडीला ताकद देईल. असे कॉंग्रेस नेते कवठणकर म्हणाले.
भाजपच्या 'हर घर तिरंगा' रॅलीला डिचोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रॅलीचे आयोजन. भाजप कार्यकर्त्यांसह आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा रॅलीत सहभाग.
मांद्रे येथील यश शूटिंग अकादमीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सुमारे 25 ते 30 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विजय सरदेसाईंनी रविवारी कुडचडेत 'संडे डायलॉग' आयोजित केला आहे. मात्र याबाबतची काहीच कल्पना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांना दिलेली नाही. विजय सरदेसाई कॉंग्रेसला घाबरतायेत? कॉंग्रेसच्या मॉरेना रिबेलोंचा प्रश्न.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.