कला अकादमी भ्रष्टाचाराचे स्मारक बनले आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. सरकारने यासंबंधी तात्काळ श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
डिचोलीत 'वेदांता'च्या खनिज वाहतुकीला एकदाची सुरवात झाली. 'एनएसपी' प्लांट ते सारमानस जेटीपर्यंत वाहतूक. पिळगावच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय स्थगित केल्यानंतर वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार सरी बरतायेत. परंतु डिचोली तालुक्यातील आमठाणे धरण अजूनही पूर्ण भरेना. सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडूनसुद्धा धरणातील जलसाठ्याची पातळी अजूनही क्षमतेपर्यंत पोहोचलेली नाही. सध्या धरणात 48.60 मीटर एवढा जलसाठा आहे.
म्हादईसंदर्भात कर्नाटकात झालेले आंदोलन म्हणजे म्हादई बाबतीत आमची भूमिका योग्य असल्याचा पुरावा. प्रवाहाच्या पाहणीमुळे कर्नाटकाचे पितळ उघडे पडेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
40 आमदारांपैकी 12 मंत्री आणि 1 सभापती आहेत. 7 विरोधी आमदारांसोबत, सरकारबरोबर असलेले 20 आमदारही विधानसभेत प्रश्न मांडून सरकारला जाब विचारत आहेत. यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा कारभार पूर्णपणे कोलमडला असल्याचे स्पष्ट होते - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यातच, मालपे न्हंयबाग येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर पुन्हा भलीमोठी दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
डिचोलीतील धबधबा परिसरातील लोकवस्तीत बिबट्या संचार करताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, संचार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बिबट्याच्या वावरामुळे नागरिक भयग्रस्त आहेत. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याकडून सापळा रचण्यात आला.
म्हादईच्या पाण्यासाठी कर्नाटकात सर्वजण एकजूटीने लढा देत आहेत. मात्र गोव्यात या एकजुटीचा अभाव दिसून येतो. 'प्रवाह'च्या संयुक्त पाहणीचा काहीच फायदा होणार नाही. बेळगावातील निषेधावर बोलताना आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
व्हिजीब्लिटीच्या कारणामुळे मोपावरील विमाने दाबोळीऐवजी बंगळूरात उतरवण्याचे प्रकार वाढले. आपल्यालाही काही दिवसांपूर्वी असाच अनुभव आला. तिसऱ्या एटेंममध्ये विमान मोपावर उतरले. यावर विधानसभेत लक्षवेधी मांडणार, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.
मंगळवारी सकाळी पावसाच्या व्यत्ययामुळे मोपावरील विमान बंगळूरात उतरवले. मोपावर इंस्ट्रूमेंट लॅण्डींग सर्व्हिस अनुपलब्ध. कतार एयरलाईन्सच्या पायलटकडून दुजोरा.
आज सकाळी मोपा विमानतळावर उतरणारे कतार फ्लाईट QR522 विमान पावसाच्या व्यत्ययामुळे थेट बंगळूरात उतरवले. दाबोळीजवळ असताना बंगळूरात का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी यावेळी विचारला.
राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी पुढील 1-3 तासात 40-50 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.