Goa Top News: म्हादई पात्राची पाहणी, अपघात आणि मॉन्सून अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 05 July 2024 News Live updates: मॉन्सून, गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या.
गोव्यात हॉस्पिटॅलिटीचा अभ्यासक्रम सुरू करणार
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak

Goa Mine Transport: खनिज वाहतुकीचे संकेत..!

उच्च न्यायलयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार खनिज वाहतूक करण्यास डिचोलीतील ट्रकमालक राजी. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या ट्रकमालक संघटनेच्या गेट बैठकीत निर्णय. 'वेदांता'च्या खनिज वाहतूकी संदर्भातच्या आशा वाढल्या.

Goa BJP: निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्याकडेच गोवा भाजपची जबाबदारी

भाजपने आशिष सूद यांची गोवा प्रभारी म्हणून निवड केली आहे. सूद लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहत होते.

Goa CM Pramod Sawant: गोव्यात हॉस्पिटॅलिटीचा अभ्यासक्रम सुरू करणार

शुक्रवारी 15 जुलैनंतर गोव्यात हॉस्पिटॅलिटी नावाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करणार, गोव्यातील आयटीआयमध्ये सहा महिने हा अभ्यासक्रम शिकवला जाणार असल्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंताची माहिती.

Mhadei River: म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या वतीने गांजे नदीची पाहणी...

सरकारने नियुक्त केलेल्या प्रवाह समितीच्या अधिकाऱ्याने म्हादई संदर्भात आज गांजे नदीची पाहणी केली.

वीज वाहिनीशी संपर्क आल्याने 18 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

बाणावली येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या 18 महिन्यांच्या बाळाचा वीज वाहिनीशी संपर्क आल्याने मृत्यू.

Mhadei River: म्हादई नदीचा वाद! आमोणे नदीची पाहणी..!

म्हादई संदर्भात केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या 'प्रवाह' अधिकाऱ्यांकडून आमोणे नदीची पाहणी. जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांसह मांडवी नदीपात्राच्या प्रवाहाची केली पाहणी.

Goa Congress: समाज कल्याण खात्याच्या इमारतीचे तात्काळ ऑडीट करा!

गुरुवारी सिलिंगचा काही भाग कोसळलेल्या पोर्तुगीजकालीन समाज कल्याण संचालनालयाच्या इमारतीचे त्वरीत ऑडीट करा. प्रदेश कॉंगेसचा पीडब्ल्युडी खात्यावर धडक मोर्चा. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आक्रमक.

Goa Weather Update: गोव्यात आज ऑरेंज, पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट

गोव्यात हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील चार दिवसांसाठी (६-९) यलो अलर्ट जारी केला आहे.

दामोदर सप्ताहाचे यंदा 125वे वर्ष, 1 कोटी महसूलाचे टार्गेट!

वास्कोतील प्रसिद्ध दामोदर सप्ताहाचे यंदाटे 125वे वर्ष. गेल्या वर्षी सप्ताहाच्या माध्यमातून 98 लाखांचा महसूल पालिकेला प्राप्त झाला होता तो यंदा 1 कोटी करण्याचे टार्गेट. पालिका सप्ताहासाठी दरवर्षी 50 हजारांची देगणी देते ती रक्कम वाढवून यंदा 1 लाख 25 हजार एवढी देणार. मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकारांची माहिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com