डिचोलीत येथे अपघातात एक ठार, टॅक्सी चालक पुन्हा आक्रमक; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Live News Today: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.
Goa Today's Live News: डिचोलीत दुचाकींचा भीषण अपघात, एक ठार
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. अंजली निंबाळकर गोव्याच्या काँग्रेस Secretary Incharge

गोव्याच्या Secretary Incharge म्हणून काँग्रेस हायकमांडकडून खानापूर कर्नाटकच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकरांची नेमणूक. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांकडून निंबाळकरांच्या नेमणुकीचे स्वागत.

वकिलाने जीवन संपवल्याची घटना, पोलिसाविरोधात गुन्हा, चौकशी होणार

वकील जयंत प्रभू यांच्या आत्महत्या प्रकरणात मिळालेल्या चिठ्ठीनुसार चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर मायना कुडतरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद. चौकशी केली जाणार असल्याची पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांची माहिती.

Goa Accident: डिचोलीत दुचाकींचा भीषण अपघात, एक ठार

डिचोलीत दुचाकींचा भीषण अपघात. मये येथील दुचाकीस्वार ठार. साष्टीवाडा-बोर्डे येथे दोन दुचाकीमध्ये शुक्रवारी सायंकाळी घडला अपघात.

टॅक्सी चालकांना बेवडे म्हणणाऱ्या रायकरला अटक करा; टॅक्सी व्यावसायिक आक्रमक

टॅक्सी चालकांना बेवडे म्हणणाऱ्या प्रविण रायकरला अटक करा अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांनी केली आहे. आक्रमक टॅक्सी व्यावसायिक कोलवा पोलिस स्थानकात दाखल झाले आहेत.

कदंब कामगारांच्या 6 पैकी 5 मागण्या मान्य, बंद तात्पुरता स्थगित

कदंब कामगारांच्या ६ पैकी ५ मागण्या मान्य. ६ सप्टेंबर रोजी पुकारलेला बंद तात्पुरता स्थगित. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कामगार आयुक्तांसमोर शुक्रवारी करार झाला. १५ ऑक्टोबर ला परत कामगार आयुक्तांसोबत मागण्यांवर आढावा बैठक होईल.

SCIC, SIC पदी नायर, बर्वेंची निवड!

राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी (SCIC) आयबीचे माजी गोवा प्रमुख अरविंद कुमार नायर तर माहिती आयुक्तपदी (SIC) आत्माराम बर्वेंची निवड.

रस्ता स्मार्टसीटीला रायबंदर येथील रस्ता दुरुस्तीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ

स्मार्ट सिटी मधील 11 पैकी 8 रस्त्यांची दुरुस्ती स्मार्ट सिटी करणार असून 3 रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यावर आज महानगरपालिकेने उच्च न्यायालयात सांगितले की पोलिस मुख्यालयासमोरील रस्ता दुरुस्तीसाठी घेण्यात आला आहे. उरलेल्या 2 रस्त्यांबद्दल न्यायालयाला माहिती देण्यात येतील.

रायबंदर येथील रस्ता स्मार्टसीटी ने दुरुस्त करायला घेतला असून तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांची माहिती

अल शादाई चाइल्ड केअर सेंटरमध्ये आढळली १५ मुले ६ वर्षाखालील

आसगाव येथे असलेल्या अल शादाई चाइल्ड केअर सेंटरची बाल कल्याण समितीने काल (गुरुवारी) केल्यावर १५ मुले ६ वर्षाखाली असलेली आढळली. सर्व मुले सुखरूप असली तरी कायद्याने चाइल्ड केअर सेंटर ने प्रत्येक मुलाची परवानगी बाल कल्याण समितीकडून घेणे बंधनकारक असते.

परंतु कसलीच परवानगी न घेता या मुलांना ठेवल्याने या अठवड्या अखेरीस बाल कल्याण समिती प्रत्येक मुलाची आणि त्यांच्या पालकांची मुलाखत घेऊन पुढील निर्णय न्यायालयात सादर करणार आहे. पुढील सुनावणी १७ सप्टेंबर ला होईल.

भाजप सरकार कुडचिरेच्या लोकांची फसवणूक करतंय; अमित पाटकर

भाजप सरकारकडून डिचोली कुडचिरेतील लोकांची फसवणूक. विशेष ग्रामसभा बोलावून होऊ घातलेल्या प्रकल्पाची सर्व माहिती जाणून घ्या. गावा पुरत्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रकल्पाची गरज नाही. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत ग्रामस्थांचा मोठा सहभाग.

Old Mandovi Bridge: कृपया नोंद घ्या! जुना मांडवी पूल आज वाहतुकीसाठी बंद राहणार

जुना मांडवी पूल दुरुस्तीच्या कामानिमित्त आज (३० ऑगस्ट) वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Anjuna: कुत्र्याच्या हल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू; मालकाविरोधात गुन्हा

हणजुण येथे एका सात वर्षीय मुलाचा Pitbull जातीच्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी आता कुत्रा मालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com