Goa Rising Temperature in Monsoon: जूनमध्ये जरा उशीराच सुरू झालेल्या पावसाने जुलैमध्ये आपले तूफान रूप दाखवले. मात्र मागील 2-3 दिवस पावसाने जरा उसंत घेतली आहे. राज्यात एकीकडे पावसाचा जोर कमी झाला आहे तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याने राज्याच्या काही भागांमध्ये काही तास तापमान वाढले. सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा चढा राहिला आहे. सोमवारी पणजीत 30 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर मुरगावमध्ये सोमवारी 29.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी राज्यात सरासरी केवळ 20.7 मिमी पाऊस झाला.
गोव्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये सुमारे 60-70% हंगामी पाऊस पडतो आणि या दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे हंगामात नेमका कसा पाऊस (सामान्य, कमी किंवा जास्त पाऊस) झाला हे ठरते.
दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर 9 आणि 10 जुलै रोजी गोव्यात सामान्य मान्सून पाऊस झाला. याबाबत हवामानशास्त्रज्ञ आणि निवृत्त NIO शास्त्रज्ञ एम आर रमेश कुमार म्हणाले की, राज्यभर बरसलेला हा हलका ते मध्यम पाऊस चांगला आहे; कारण या पावसाचे पाणी जमिनीत मुरते. अशा प्रकारच्या पावसामुळे अतिवृष्टीचा धोका संभवत नाही.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 11 आणि 14 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच 12 आणि 13 जुलैला बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.