Sub-Junior Aquatics Championships: गोव्याच्या पूर्वी नाईकचा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दमदार परफॉर्मन्स; 2 सुवर्ण, 1 रौप्य जिंकलं

41st Sub Junior National Aquatic Championships 2025: गोव्याची प्रतिभावान तरुण जलतरणपटू पूर्वी रितेश नाईक हिने आपल्या जबरदस्त कामगिरीने पुन्हा एकदा गोव्याचा झेंडा उंचावला आहे.
Sub-Junior Aquatics Championships
Sub-Junior Aquatics ChampionshipsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याची प्रतिभावान तरुण जलतरणपटू पूर्वी रितेश नाईक हिने आपल्या जबरदस्त कामगिरीने पुन्हा एकदा गोव्याचा झेंडा उंचावला आहे. बेंगळुरू येथे पार पडलेल्या ४१ व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर अ‍ॅक्वाटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

स्पर्धेत गट III मुलींच्या गटात तिला विजेता घोषित करण्यात आले. मंगळवारी पूर्वीने १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावले.

तर ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक मिळवले. त्याआधी २०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेतही सुवर्ण जिंकून तिने आपल्या विजयी मालिकेची नोंद केली.

Sub-Junior Aquatics Championships
Goa Crime: रस्त्यावर अडवून बेदम मारहाण, 12 लाखांचे दागिने - मोबाईल पळवला; जखमी 'अंकल'च्या पार्श्वभूमीमुळे वाढली गुंतागुंत

पूर्वी सध्या म्हापसा येथील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्रशिक्षक सुजित टी ए यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि तल्लख कौशल्यामुळे ती गोव्याची जलतरण क्षेत्रातील एक उज्वल आशा ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com