Goa Sports:देशासाठी जागतिक कीर्तीचे खेळाडू तयार करणारे गोव्यातील क्रीडा शिक्षक संदेश बाराजणकर

भारतीय लष्करात जाण्याची संधी हुकली खरी पण शारीरिक शिक्षक बनून देशासाठी खेळाडू घडविण्याची देशसेवा करणाऱ्या क्रीडा शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास.
Sandesh barajankar
Sandesh barajankarDainik Gomantak
Published on
Updated on

आपण लहान असताना खूप सारी स्वप्नं बघत असतो. मोठे झाल्यावर डॉक्टर, इंजीनिअर, बिझनेसमन होऊ अशी ती भाबडी इच्छा असते. पण लहानपणी बघितलेली ही स्वप्ने सर्वांचीच साकार होतात असं नाही. काहींना त्यासाठी लागणारे मार्गदर्शन देणारं कोणीच नसतं.

पाळी सुर्ला या खेडेगावातील बाराजण वाडा इथल्या शेतकरी कुटुंबातील जन्मलेला मुलगा. बालपण हालाखीचेच. गावामध्ये येण्यासाठी रस्तादेखील नाही. अशा या गावातील छोटा मुलगा भारतीय लष्करात ज्याण्याची स्वप्नं बघत होता.

Sandesh barajankar
37th National Games:'या' पारंपरिक खेळाची ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 'प्रदर्शनीय खेळ' म्हणून निवड

पण त्यासाठी लागणारे मार्गदर्शन घेणार कुणाकडे? भारतीय लष्कराचा गणवेश त्याला खूप आवडायचा. मोठा झाल्यावर लष्करात कमांडर होणार असे त्याने ठरविले होते आणि त्या दृष्टीने प्रयत्नही चालू केले. गुरांना चरायला सोडून शेतामध्ये दंडबैठका, लांब उडी, उंच उडी असे प्रकार तो करायचा.

पण म्हणतात ना की नियतीच्या मनातलं कुणी ओळखू शकत नाही. योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्याचे हे स्वप्न शेवटपर्यंत स्वप्नच बनून उरले. परंतु शेतात चालू असलेल्या व्यायामामुळे त्याची शरीरयष्टी खूप दणकट बनली होती ज्याचा फायदा त्याला पुढील आयुष्यात झाला.

तो लहान मुलगा म्हणजे आयडियल हायस्कूलचे शारीरिक शिक्षक संदेश बाराजणकर. आजपर्यंत त्यांचा हाताखालून मार्गदर्शन घेऊन कितीतरीच खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके पटकाविली आहेत.

आत्ता गोव्यात होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देखील त्यांचा मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडूंनी भाग घेतला आहे. ते स्वतः उत्तम क्रीडापटू असून कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना जेवलिंग थ्रोवर म्हणूण त्यांनी कारकीर्द सुरू केली होती.

Sandesh barajankar
PM Modi: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळाडूंमधील खिलाडूवृत्ती आणि एकता वाढवतील : पंतप्रधान मोदी

संदेश बाराजणकर यांचे पूर्ण बालपण सुर्ला या गावात गेले. जिथे जायला रस्ताही नाही तिथे क्रीडांगण किंवा खेळण्यासाठी मैदान असणे शक्यच नाही. गावाबाहेर होंडा येथे असलेल्या शाळेत रोज चालत जाऊन त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

तिथे शिकत असताना स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा (SAG) तर्फे खेळाडूंसाठी असलेल्या चाचणी परीक्षेतून त्यांची निवड करण्यात आली. त्यांनी सेंट अॅंथनी मोंतेगिरी येथे १ वर्ष आणि फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम वर २ वर्षे राहून अॅथलेटीक चे शिक्षण पूर्ण केले.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर साखळी येथील महाविध्यालयात शिकत असताना म्हापसा येथे रघुनाथ शिंदे यांच्याकडून ज्युडो चे प्रशिक्षण घेतले. विविध क्रीडास्पर्धेत त्यांची होणारी प्रगती आणि खेळांचे असलेले ज्ञान पाहून महाविध्यालयाचे तत्कालीन संचालक डॉ. के के बाबली सरांनी त्यांना शारीरिक शिक्षक बनण्यासाठी प्रोत्साहित केले.

२००१ साली कॉलेज शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी मिरजला जाऊन १ वर्ष शारीरिक शिक्षकाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर २००४ साली पिळगाव च्या आयडियल हायस्कूल मध्ये कायमस्वरूपी शारीरिक शिक्षक म्हणून रुजू झाले.

सध्या होंडा येथे वास्तव्यास असलेले संदेश बाराजणकर योगा प्रशिक्षक देखील आहे. शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता यावा यासाठी २००५ मध्ये गोव्यात कांपाल येथे झालेल्या योग गुरु रामदेव बाबा यांच्या शिबिरात त्यांनी सहभाग घेतला.

तिथे त्यांना योग शिक्षक प्रशिक्षणाची माहिती समजली आणि त्यांनी पतंजलि तर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षण शिबिरातून योगशिक्षकाची पदवी मिळाविली. आत्तापर्यंत गावोगावी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विनाशुल्क ३०० पेक्षा जास्ती शिबिरे आणि २५ योग शिक्षक शिबिरे घेतली आहेत.

गोव्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील संघटनेवर त्यांनी भूमिका बाजविल्या आहे. ज्युडो, लगोरी, दोरीउड्या यासोबतच सध्या योगासना स्पोर्ट्स असोसिएशनच्या सरचटणीस म्हणून काम पहात असून राज्यभर विविध ठिकाणी योगा सेंटर चालू केले आहे. जवळपास ५०० मूलं या सेंटरमधून योग प्रशिक्षण घेत आहेत.

मागील ३ वर्षात राष्ट्रीय पातळीवर गोव्याने योगासनात १३ पदके प्राप्त केली असून खेलो इंडिया, राष्ट्रीय तसेच मास्टर्स नॅशनल मध्ये ही कामगिरी करून दाखविली आहे. २०१८ साली शाळेतील १११ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन १० हजार सूर्यनमस्कार घालून गोल्डन बूक रेकॉर्ड करण्याचा मान मिळविला आहे.

त्यांचे हे योगासनांवर असलेले प्रेम आणि राज्यभर योगसंबंधी केलेल्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्याची दाखल घेत क्रीडाभारतीने त्यांना राज्य स्तरावर ‘योगश्री’ या पुरस्काराने सन्मानित केले. त्याचप्रमाणे २०१५ साली आविष्कार फाऊंडेशन कडून ‘उत्कृष्ट शारीरिक शिक्षक’ पुरस्कार मिळाला आहे.

“भारतीय लष्करात जाण्याची संधि जारी चुकली तरी शिक्षक बनून विद्यार्थी घडविण्याचे काम हे देखील एक देशसेवाच आहे आणि त्यात मी समाधानी आहे. हल्लीचे वातावरण बघता विद्यार्थ्याना योग्य वळण लावण्याची शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.”
संदेश बाराजणकर, शारीरिक शिक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com