Goa Cricket Association: पानवेल क्लब राज्यस्तरीय विजेता

Goa Cricket Association: ‘एमआरएफ’ला नमविले, मयुरेशची अष्टपैलू छाप
Goa Cricket Association
Goa Cricket AssociationDainik Gomantak

Goa Cricket Association: मयुरेश तांडेल (७३ धावा व ६-२९) याच्या अप्रतिम अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पानवेल स्पोर्टस क्लबने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या ब गट क्रिकेट स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले.

त्यांनी एमआरएफ क्रिकेटर्स क्लबला ६६ धावांनी नमविले. अंतिम सामना सोमवारी पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

पानवेल क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २१४ धावा केल्या. मयुरेशने आक्रमक फलंदाजी करताना ६८ चेंडूंतील नाबाद खेळीत नऊ चौकार व एक षटकार मारला.

नंतर त्याने ९-३-२६-६ अशी भेदक गोलंदाजी करत एमआरएफ क्रिकेटर्सचा डाव १४८ धावांत गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक:

पानवेल स्पोर्टस क्लब ः ४१.३ षटकांत सर्वबाद २१४ (रजत शेट २९, सचिन सरदेसाई १५, आदित्य नाईक ३३, प्रज्योत रिवणकर १३, मयुरेश तांडेल नाबाद ७३, वेदांत नाईक १६, रॉबिन डिसोझा १६, चेतन म्हार्दोळकर २-४५, हेमराज पुरोहित २-४१, मनीष नाईक गावकर २-२०, शिवम मंगेशकर ४-४७)

वि. वि. एमआरएफ क्रिकेटर्स क्लब: ३२.३ षटकांत सर्वबाद १४८ (दुर्गेश प्रभुगावकर १२, जग्गू पाटील १६, हेमराज पुरोहित २४, चेतन म्हार्दोळकर २४, साईश प्रभुदेसाई नाबाद ३९, रजत शेट २-३४, मयुरेश तांडेल ६-२९).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com