I-League 2 Football: अव्वल स्पोर्टिंग गोवा महत्त्वाच्या टप्प्यावर

I-League 2 Football: धेंपो क्लबविरुद्ध आज लढत
I-League 2 Football
I-League 2 FootballDainik Gomantak

I-League 2 Football: आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत अव्वल राहण्यासाठी स्पोर्टिंग क्लब द गोवा संघासाठी सोमवारी (ता. १२) धेंपो स्पोर्टस क्लबविरुद्ध होणारा सामना फारच महत्त्वाचा असेल.

बंगळूर युनायटेड व स्पोर्टिंग क्लब बंगळूर संघही पुढील मोसमातील आय-लीग पात्रतेसाठी प्रमुख दावेदार असल्यामुळे गोव्यातील लढतीचा निकाल निर्णायक ठरेल.

धेंपो स्पोर्टस क्लब व स्पोर्टिंग क्लब द गोवा यांच्यातील सामना एला-जुने गोवे येथील मैदानावर खेळला जाईल. सध्या स्पोर्टिंग गोवा व बंगळूर युनायटेड यांचे समान दहा गुण आहेत.

स्पोर्टिंग बंगळूर नऊ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर ऑरेंज एफसीचे सहा, केंकरे एफसी, धेंपो क्लब व युनायटेड स्पोर्टस क्लब यांचे समान चार गुण आहेत.

धेंपो स्पोर्टस क्लब माजी आय-लीग विजेता संघ असला, तरी या संघातील नव्या दमाच्या खेळाडूंना अजून सूर गवसलेला नाही.

स्पोर्टिंग गोवाने मागील लढतीत ऑरेंज एफसीवर दोन गोलने विजय नोंदवून स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली.

त्याचवेळी धेंपो क्लबला केंकरे एफसीकडून दोन गोलने हार पत्करावी लागली. त्यांचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. त्यामुळे आठ संघांत त्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली.

आय-लीग ३ स्पर्धेत मागील २८ डिसेंबरला झालेल्या लढतीत स्पोर्टिंग गोवाने धेंपो क्लबला एका गोलने हरविले होते.

सलग तीन लढतीत क्लीन शीट

‘‘आम्ही सध्या अव्वल असून आम्हाला हे स्थान राखून ठेवायचे आहे. आम्हाला नियोजनबद्ध खेळ करताना आघाडीत जास्त क्रियाशील राहावे लागेल,’’ असे मत स्पोर्टिंग गोवाचे तांत्रिक सल्लागार क्लायमॅक्स लॉरेन्स यांनी व्यक्त केले.

स्पर्धेत त्यांनी बचावात प्रभावी कामगिरी करताना फक्त तीन गोल स्वीकारले आहेत. गोलरक्षक डायलन दा सिल्वा याने सलग तीन सामन्यांत क्लीन शीट राखताना एकही गोल स्वीकारलेला नाही.

बचावफळीत जॉयनर लॉरेन्स, कर्णधार ज्योएल कुलासो, क्लुसनर परेरा, कुणाल मडकईकर उल्लेखनीय ठरले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com