
Indian Super League इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अनुभवी मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली असून नेतृत्व चमूत आंतरराष्ट्रीय बचावपटू संदेश झिंगन याच्यासह ओदेई ओनाइंडिया व कार्ल मॅकह्यू या परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला.
माजी लीग शिल्ड विजेते यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना येत्या दोन ऑक्टोबरला फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पंजाब एफसीविरुद्ध खेळतील.
आयएसएल स्पर्धेच्या दहाव्या मोसमासाठी 25 सदस्यीय एफसी गोवा संघाची बुधवारी घोषणा झाली. मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्यासह बेनिटो माँटेल्व्हो, गौरमांगी सिंग, ॲसिएर रे सांतिन, होझे कार्लोस बार्रोसो यांचा सपोर्ट स्टाफमध्ये समावेश आहे.
एफसी गोवा संघात आठ स्थानिक खेळाडूंचा समावेश असून ह्रतीक तिवारी, लिअँडर डिकुन्हा, सावियर गामा, ब्रायसन फर्नांडिस यापूर्वी डेव्हलपमेंट संघात होते.
गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाला सातवा क्रमांक मिळाला होता. यंदा अनुभवी मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी सुधारण्यासाठी संघाचा प्रयत्न आहे.
2023- 24 मोसमाच्या सुरवातीस झालेल्या 132 व्या ड्युरँड कप स्पर्धेत एफसी गोवाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यांचा आयएसएलमधील यंदाचा पहिला सामना 22 सप्टेंबरला हैदराबाद एफसीविरुद्ध हैदराबाद येथे होणार होता.
प्रमुख खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघात झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला.
आयएसएल स्पर्धेसाठी एफसी गोवा संघ
गोलरक्षक: धीरज सिंग, अर्शदीप सिंग, ह्रतीक तिवारी.
बचावपटू: सॅनसन परेरा, संदेश झिंगन, कार्ल मॅकह्यू, नारायण दास, लिअँडर डिकुन्हा, ओदेई ओनाइंडिया, बोरिस सिंग, सेरिटन फर्नांडिस, सावियर गामा, जय गुप्ता.
मध्यरक्षक: रेनियर फर्नांडिस, ब्रँडन फर्नांडिस, आयुष छेत्री, उदांता सिंग, रॉलिन बोर्जिस, पावलो रेट्रे, व्हिक्टर रॉड्रिगेझ, ब्रायसन फर्नांडिस, मुहम्मद नेमिल.
आघाडीपटू: नोआ सदोई, कार्लोस मार्टिनेझ, देवेंद्र मुरगावकर.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.