

Save Goa Campaign
पणजी: राज्यातील पर्यावरण, डोंगर, नद्या, जमीन सांभाळण्यासाठी अनेक कायदे आहेत परंतु या कायद्याचे रक्षकच ते मोडत आहेत. अनेक सुजाण गोमंतकीय न्यायालयात जाऊन गोवा वाचवत आहेत. गोव्याला सुरक्षित ठेवण्यासाठी लढा देणाऱ्यांना साथ देत असून गोवा वाचविणे गरजेचे असून आम्हाला गोवा सुरक्षित हवाय , असे मत ‘गोवा बचाओ अभियान’च्या सबिना मार्टिन यांनी व्यक्त केले.
त्या ‘सेव्ह गोवा एन्व्हायर्नंमेट’ संघटनेने पणजीत चर्च स्केवअर ते आझाद मैदान या मार्गावर गोव्यातील पर्यावरण, गाव वाचविण्यासाठी काढलेल्या ‘कॅन्डल मार्च’ दरम्यान माध्यमांशी बोलत होत्या. या फेरीला राज्यभरातील नागरिकांनी विविध संघटनांनी सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना दयानंद मांद्रेकर म्हणाले, दीड वर्षापूर्वी सरकारने केवळ पेडण्यासाठी वेगळा प्लान आणला होता त्याला एकजूटीने पेडणेवासीयांनी आवाज उठविल्याने मागे घ्यावा लागला त्यामुळे नागरिकांनी एकत्र येत आपले लहानशे गोवा राज्य वाचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने पोंबर्फा गावात ‘नो डेव्हलपमेंट झोन’ जाहीर करण्याचे आश्वासन मागील विधासभा अधिवेशनावेळी दिले होते. परंतु आता या आश्वासनाला सहा महिने उलटूनही सरकार दखल घेत नाही आहे. आज राज्यात पिण्याचे पाणी मिळत नाही, झाडे, डोंगर नष्ट होत आहेत. गावचे गावपण आणि गावातील जैविक संपदा धोक्यात असल्याचे दिरेंद्र फडते यांंनी सांगितले.
सरकार दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून एक प्रकारे थट्टा करत आहे. सरकारला गोमंतकीयांचे काही पडलेले नाही. आमची संस्कृती, परंपरा,वारसा कोण सांभाळणार? जनेतेने आमदारांना स्थानिक प्रश्नांवर विधानसभेत चर्चा करून ते सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु तसे काही होत नाही ही शोकांतिका आहे,असे फा. बॉलमेक्स यांनी सांगितले. आज प्रत्येक गावात अनेक प्रश्न,समस्या निर्माण झाले आहेत परंतु राजकारण्यांना त्याचे काही पडलेले नाही. दहा-बारा वर्षापूर्वी जो गोवा होता तो पुन्हा हवाय. पीटर डिसोझा म्हणाले, सरकारचे प्रेम बिल्डरांवर अधिक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.