Water Shortage: पाणी ही समृद्धी आहे मात्र पाण्याची नासाडी करू नका

Water Shortage: मंत्री शिरोडकर : मळकर्णे येथे ‘जल ही जीवन है’ कार्यक्रम
Goa Water | Goa News
Goa Water | Goa NewsDainik Gomantak

Water Shortage: आजपर्यंत निसर्गाचा सांभाळ गावातील लोकांनी केला म्हणून आपला भारत देश शेतीप्रधान बनला. गोव्यातील हजारो चौरस मीटर जमीन ओलिताखाली आहे. शेतीसाठी जलसिंचन करणे हे आपल्या खात्याचे कर्तव्य आहे. म्हणूनच 15 नोव्हेंबर रोजी कालव्यातून पाणी सोडणार हा संकल्प होता व आज तो पूर्ण केला.

मात्र पाण्याची नासाडी करू नका. पाणी ही समृद्धी आहे. मिळालेल्या पाण्याचा योग्‍य प्रकारे वापर करून शेती फुलवा असे सांगून राज्‍यातील सात शेतीप्रधान तालुक्यांना दर महिन्याला आपण भेटी देणार असल्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

मळकर्णे येथे ‘जल ही जीवन है’ या कार्यक्रमात शिरोडकर बोलत होते. व्यासपीठावर सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, जलसंपदा खात्याचे मुख्य अधिकारी सुभाष चंद्रन, श्री. सालेलकर, मळकर्णेचे सरपंच राजेश गावकर, रिवणच्या सरपंच वैशाली नाईक, कावरे-पिर्ला सरपंच विधी वेळीप, बायो भंडारी, शशिकांत गावकर, सांगेच्या कृषी अधिकारी मीलन गावकर, केपेचे संदेश राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री फळदेसाई म्‍हणाले की, शेतीसाठी साळावली धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्याचा संकल्प सुभाष शिरोडकर पूर्ण केला आहे. त्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन. धरणांचे पाणी शेती, बागायती, पिण्यासाठी तसेच औद्योगिक वसाहतींसाठीही वापरले जात आहे.

पाच एमएलडी क्षमतेचा जलप्रकल्प मार्गी लागला तर भाटी-नेत्रावळी, वाडे-कुर्डी येथील पाणी प्रश्न सुटेल. वालकिणी येथील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्‍यात आल्‍या आहेत.

शेती विकसित करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी मंत्र्याच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्‍यात प्रामुख्याने रमेश गावकर, सुरेश गावकर, दिलीप नाईक, मिनिनो ग्रासियस, लक्ष्मण गावकर यांचा सहभाग होता.

कृषी अधिकारी मीलन गावकर यांनी शेतकऱ्यांना त्‍यांच्‍यासाठी असलेल्‍या योजनांबद्दल माहिती दिली. सरपंच राजेश गावकर यांनी स्वागत केले तर त्‍यांनीच शेवटी आभार मानले.

Goa Water | Goa News
Panaji Police: अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी एकाच्या मुसक्या आवळल्या

साळावलीला कुणबी हब बनविणार

सांगे हा कृषीप्रधान भाग असल्याने पाणी उपलब्ध करून दिल्यास ओसाड जमिनी लागवडीखाली येतील. शेतीची आवड नसलेल्यानी आपल्‍या जमिनी कंत्राटी शेती करण्यासाठी दिल्यास शेती वापरात येईल. सरकारने जमीन दुरुस्ती कायदा आणला पाहिजे.

तसेच सरकारी जमीन हडप करण्याचे प्रकार उघड होत असून त्‍यात मंत्र्यांनी लक्ष घालावे असे आवाहन करून फळदेसाई यांनी साळावली येथे कुणबी हब उभारण्याचा संकल्प केला. केंद्र सरकारच्या माध्यमातून पशूचिकित्सा केंद्र सांगेत उभारण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सुमारे दीडशे तळी साफ करणार

वर्षभर पुरेल इतके पाणी सध्‍या राज्यात उपलब्ध आहे. सरकारने काजूमळ, तातोडी, चरावणे आणि कर्वे येथे धरणे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील सुमारे दीडशे तळ्‍यांतील गाळ उपसून तेथे पाणी साठवण करण्यात येणार आहे.

पुढील वर्षभरात 100 कोटी रुपये खर्चून खांडेपार नदीचे पाणी शिरोडा मतदारसंघात पोचविणार असल्याची ग्‍वाही मंत्री शिरोडकर यांनी दिली. त्‍यामुळे शिराेडा मतदारसंघातील पाण्‍याची समस्‍या सुटण्‍यास मदत होणार आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com