Rahul Gandhi Goa Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी गोवा दौऱ्यावर! 'हे' आहे कारण

नागरिक, व्यापारी यांच्याशी चर्चा
Rahul Gandhi Goa Visit
Rahul Gandhi Goa VisitDainik Gomantak
Published on
Updated on

Rahul Gandhi Goa Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी आज पासून दोन दिवसाच्या खाजगी दौऱ्यावर गोव्यात येत आहेत. यात पक्षाला त्यांनी सामावून घेतलेले नाही, मात्र आज बुधवारी रात्री आणि उद्या दिवसभरात काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या ते भेटी घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पुढाकाराने साऱ्या विरोधकांना एकत्रित करण्याचे काम केले आहे. त्यातूनच निर्माण झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी देशातल्या विविध भागांमध्ये दौरे सुरू केले आहेत.

लोकसभेच्या राज्यात दोन जागा असून या दोन जागांवर काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे. यासाठी राहुल गांधी राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची चर्चा करणार आहेत. याशिवाय राज्याभरातील काही व्यवसायिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्याही जाणून घेणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com