Goa Corona Update: गोव्यात 109 अॅक्टिव्ह कोरोना रूग्ण; आज 23 नव्या रूग्णांची वाढ

राज्यात तीन दिवसांत 63 कोरोना रूग्णांची वाढ
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

Goa Corona Update: गोव्यात आज (गुरूवारी) दिवसभरात 23 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 31 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रूग्णसंख्या शंभरहून अधिक असून, सध्याच्या घडीला 109 अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases in Goa) उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.41 टक्के एवढा झाला आहे.

Goa Corona Update
Goa Government: कामगारांच्या किमान वेतनात लवकरच सुधारणा केली जाईल; बाबूश मोन्सेरात

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 556 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 434 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 671 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत.

Goa Corona Update
Raid in Goa : कमी वजनाच्या सिलिंडरची तक्रार; पर्वरीत धाडसत्र

देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 0.85 टक्के

भारतात सध्याच्या घडीला 25,510 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases) उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत 2,141 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 2,579 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.76 टक्के एवढा आहे. देशात आजवर 219 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यापैकी, 94.98 कोटी नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर, 21.96 कोटी नागरिकांनी सुरक्षात्मक डोस घेतले आहेत. (Covid-19 Cases in India)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com