GOA: आरोग्यमंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण

Vishwajit Rane
Vishwajit Rane

पणजी: आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) हे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत त्यामुळे माझ्यात व त्यांच्यात कोणताच वाद नव्हता, मात्र काही विषयावरून मतभेद असू शकतात असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(CM Dr Pramod Sawant) यांनी घटक राज्यदिनी एका स्थानिक चित्रवाणीवरील मुलाखतीवेळी स्पष्ट केले. विरोधकांनी कोविड काळात राज्याच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (Goa Regarding Health Minister Vishwajit Rane Explanation by CM Dr Pramod Sawant)

कोविड व्यवस्थापनावरून आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यात वाद असल्याची चर्चा गोव्यात सुरू झाली होती. सरकारी इस्पितळामधील व्यवस्थापनातही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः लक्ष घालण्‍यास सुरवात केली. वारंवार डॉक्टर्सच्या बैठका तसेच इस्पितळांना भेटी देऊ लागल्याने आरोग्यमंत्री राणे यांचा असलेला प्रभाव कमी झाला. दोघांमधील वादात कोविड रुग्णांचे हाल होत आहेत असा सूर राज्यभरातील लोकांमध्ये सुरू झाला होता. त्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना विचारलेल्या प्रश्‍नाला मुख्यमंत्र्यांनी बगल देत सावधगिरीने उत्तर दिले. 

कोविड व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला अशी टीका विरोधक करतात त्यावर स्पष्टीकरण करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडसंदर्भात विरोधक ज्या सूचना फेसबुक किंवा ट्विट करून देतात त्या मी वाचतो व ऐकून घेतो. राज्याच्या हितासाठी एखादी गोष्ट विरोधकांकडून आली तर त्यावर विचार करून लागू करतो. त्यामुळे विरोधकांनी राजकारण सोडून सूचना तसेच सल्ला करण्यास हरकत नाही असे ते म्हणाले. 

कोकणी भाषा बोलताना मुख्यमंत्री क्रियापद वापरतात ते कोकणीतून नसते अशी टीका केली जाते यावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पेडणे ते काणकोणपर्यंत कोकणी भाषा वेगवेगळी आहे. माझी कोकणी भाषा शुद्ध नसेल हे मी मान्य करतो.  मी अधिक तर मराठीतून वाचन केले आहे. त्यामुळे कोकणी भाषा बोलताना एखाद दुसरा मराठीचा शब्द त्यामध्ये येऊ शकतो. यावरून टीका झाली तरी मला चिंता नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com