उसगावात मुसळधार पाऊस, नव्यानेच हॉटमिक्सिंग केलेला रस्ता खचला; वाहतूक बंद!

Goa Rain Update: उसगावात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे.
उसगावात मुसळधार पाऊस, नव्यानेच हॉटमिक्सिंग केलेला रस्ता खचला; वाहतूक बंद!
Goa Rain Update Due to heavy rain in Usgaon the road has been closed for trafficDainik Gomantak

उसगावात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. यातच, नव्यानेच हॉटमिक्सिंग केलेला रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. याशिवाय, सरकारी शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर झाड कोसळले. त्याचवेळी, रस्त्यावरुन जाणारी कार झाडाखाली येण्यापासून वाचल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर फोंडा अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला केले.

दरम्यान, अतिवृष्‍टीमुळे राज्‍यात मोठी हानी झाली आहे. हवामान खात्‍याने आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. दक्षिणेत केपे-कुशावती नदीने पातळी ओलांडली असून, उत्तरेत डिचोलीतील काही भागांत अद्याप पाणी कायम आहे. धारगळीत महामार्गावर दरड कोसळली असून त्‍यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

राज्‍यात गेल्‍या 24 तासांत 9.26 इंच पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून एकूण पर्जन्‍य 57.67 इंच झाले. दक्षिण गोव्‍यात अनेक भागांत पावसाचा फटका बसला. कुशावती नदी दुथडी भरुन वाहू लागली असून पात्र आणि धरण समपातळीवर आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com