Goa Public University Bill: 'गोवा सार्वजनिक विद्यापीठ' विधेयकावर सूचनांचा पाऊस! 'क्लस्टर युनिव्हर्सिटी'वर चर्चा; सुभाष शिरोडकरांनी पुन्हा बोलावली बैठक

University Bill Review Meeting: गोवा सार्वजनिक विद्यापीठ विधेयकासंदर्भात स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या चिकित्‍सा समितीच्‍या पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारच्‍या बैठकीत आपल्‍या सूचना मांडल्‍या.
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा सार्वजनिक विद्यापीठ विधेयकासंदर्भात स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या चिकित्‍सा समितीच्‍या पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारच्‍या बैठकीत आपल्‍या सूचना मांडल्‍या. याबाबत महाविद्यालयांच्‍या व्‍यवस्‍थापनांची मते जाणून घेण्‍यासाठी येत्‍या १९ नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पुन्‍हा बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहिती मंत्री तथा चिकित्‍सा समितीचे अध्‍यक्ष सुभाष शिरोडकर (Subhash Shirodkar) यांनी दिली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिरोडकर म्‍हणाले की, गोवा सार्वजनिक विद्यापीठ विधेयकाबाबत बुधवारी घेण्‍यात आलेल्‍या पहिल्‍या बैठकीत केवळ सदस्‍यांच्‍या सूचना जाणून घेण्‍यात आल्‍या. हे विधेयक मंजूर होऊन राज्‍यात क्‍लस्‍टर विद्यापीठे स्‍थापन केल्‍यास त्‍याचा गोवा विद्यापीठ आणि महाविद्यालयांवर कितपत परिणाम होईल?, असे विद्यापीठ राज्‍याला हवे की नको? अशा विषयांवर बैठकीत चर्चा झाली. समितीच्‍या सदस्‍यांनी त्‍यावर आपापली मते मांडलेली आहेत. आता याबाबत महाविद्यालयांच्‍या व्‍यवस्‍थापनांसोबत चर्चा करण्‍यात येणार असून, त्‍यासाठी येत्‍या १९ नोव्‍हेंबरला बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.

Subhash Shirodkar
Goa Public University Bill: 'सार्वजनिक विद्यापीठे' स्थापनेचा मार्ग सुकर, ऐतिहासिक बदलांसाठी विधेयक सादर

घाईगडबडीत निर्णय नकोच : सरदेसाई

गोवा (Goa) सार्वजनिक विद्यापीठ विधेयक मंजूर झाल्‍यास गोवा विद्यापीठ संपून जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे याबाबत घाईगडबडीत निर्णय घेणे योग्‍य नाही. महाविद्यालय व्‍यवस्‍थापनांच्‍या सूचना जाणून घेणे तितकेच महत्त्‍वाचे आहे. त्‍याचसाठी येत्‍या १९ नोव्‍हेंबरला पुन्‍हा बैठक घेण्‍याचे निश्‍चित करण्‍यात आले असल्‍याची माहिती आमदार तथा समितीचे सदस्‍य विजय सरदेसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com