Porvorim Robbery: पर्वरीत 7000 रुपयांच्या इलेक्ट्रीक मीटरची चोरी; बेळगावमधला युवक पोलिसांच्या ताब्यात

Electric Meter Robbery in Porvorim: बेळगावमधील इसमाला 7000 रुपयांचा इलेकट्रीक मीटर चोरल्याप्रकरणी अटक
Electric Meter Robbery in Porvorim: बेळगावमधील इसमाला 7000 रुपयांचा इलेकट्रीक मीटर चोरल्याप्रकरणी अटक
Porvorim Robbery Dainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim,Goa

पर्वरी: पर्वरी पोलिसांनी काल (दि. 24 सप्टेंबर) रोजी नरेंद्र गावडे नावाच्या एका इसमाला 7000 रुपयांचा इलेकट्रीक मीटर चोरल्याप्रकरणी अटक केली आहे. बेळगावमधील या 25 वर्षीय युवकाने पर्वरीतील इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटच्या सब डिव्हिजनमध्ये चोरी केली होती.

केवळ इलेक्ट्रिसिटीचा मीटरच नाही तर या इसमाकडून पोलिसांनी एक दुचाकी सुद्धा हस्तगत केली असून ती देखील चोरीचा माल असू शकते असा अंदाज आहे.

पर्वरी इलेकट्रीसिटी विभागाकडून पोलिसांना 23 सप्टेंबर रोजी या घटनेची माहिती देण्यात आली होती. एका अज्ञात माणसाने पर्वरीतील इलेकट्रीसिटी विभागातील डिव्हिजन दोन या भागात घुसून मीटर घेऊन पलायन केले होते. गोवा पोलिसांकडून या घटनेचा तपास पूर्ण झाल्यानंतर बेळगावमधील या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Electric Meter Robbery in Porvorim: बेळगावमधील इसमाला 7000 रुपयांचा इलेकट्रीक मीटर चोरल्याप्रकरणी अटक
Unemployment Rate: सर्वात छोटं राज्य; मात्र बेरोजगारीचा दर सर्वात अधिक!! तरुणांमध्ये बेरोजगारीचा आकडा वाढला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com