Pravin Arlekar: पेडणेचे आमदार दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा

Pravin Arlekar: रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम : दिव्यांग, अनाथांसमवेत वाढदिवस साजरा
Pravin Arlekar |Goa News
Pravin Arlekar |Goa NewsDainik Gomantak

Pravin Arlekar: पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आज आपला वाढदिवस रक्तदान,आत्मविश्वास विद्यालयातील दिव्यांग मुलांसोबत, पेडणे सरकारी इस्पितळात रुग्णांना भेटून तसेच नानेरवाडा पेडणे येथील अनाथाश्रमाला भेट देऊन साजरा केला. आमदार आर्लेकर यांच्यावर चाहत्यांनी वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव केला.

आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सोबत आर्लेकर यांचे स्वीय सचिव राजन शेट म्हापसेकर देवसू कोरगावचे पंचायत सदस्य देविदास नागवेकर आदींनी रक्तदान केले. यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आर्लेकर यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

तुये आत्मविश्वास या विशेष मुलांच्या शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहवासात त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी नाच गाणी सादर केली. आर्लेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे गीत नाचून सादर केले, त्यात आमदार आर्लेकरही सामील झाले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ,फळे व जेवण दिले.

यावेळी पेडणे भाजप अध्यक्ष तुळशीदास गावस यांच्या सहकार्याने जादूगार रवी यांचे जादूचे प्रयोग झाले.आत्मविश्वास शाळेला माझे नेहमीच सहकार्य असेल,असे यावेळी आमदार आर्लेकर म्हणाले.

Pravin Arlekar |Goa News
Panchwadi WTP Accident: पंचवाडी पाणी प्रकल्पात क्लोरीन लिकेजमुळे मोठा अपघात; 4 कामगार अत्यवस्थ

वृद्धाश्रम तसेच इस्पितळात रुग्णांना फळे वाटप

आर्लेकर यांनी पेडणे सरकारी इस्पितळातील रुग्णांची भेट घेऊन रुग्णांना फळे वाटण्यात आली.तर दुपारी स्नेह सेवा वृध्दाश्रमाला भेट देऊन रुग्णांना फळे दिली.रात्री भाईड कोरगाव येथील टॉम लिब गार्डन मध्ये आयोजित कार्यक्रमात मतदार,विविध गावातील सरपंच ,पंच,नगरसेवक,राजकीय व सामाजिक स्थरावरील अनेक मान्यवरांनी येऊन शुभेच्छा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com