Jit Arolkar: मांद्रे मतदार संघातील पर्यायाने पेडणे तालुक्यातील जनतेसाठी कलाकारांसाठी लवकरच मांद्रे मतदारसंघात कला भवन उभारण्यात येणार आहे.
याशिवाय मांद्रे उदरत संस्थेअंतर्गत ज्या पद्धतीने दीपोत्सव मोठ्या उत्साहात यशस्वी करून दाखवला त्याच सारखा नाताळ उत्सवही सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
तसेच जानेवारी महिन्यामध्ये पेडणे तालुक्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन मांद्रे उदरगत संस्थेअंतर्गत केले जाईल, अशी माहिती मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी दिलीय.
मांद्रे कार्यालयात दीपोत्सवाच्या निमित्ताने पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि पाक कला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आरोलकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर दिपोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष अजित मोरजकर महिला अध्यक्ष सुनीता बुगडे देसाई, पंच सदस्य सागर तिळवे, लक्ष्मीकांत गवंडी, पंच नाईक आदी उपस्थित होते.
स्पर्धांचे निकाल खालील प्रमाणे:-
पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस महेश खडजी, रांगोळी स्पर्धेचे प्रथम बक्षीस दीपेश नाईक, तर पोहे फराळ स्पर्धेमध्ये सविता सावंत यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.
त्यांना आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. आकाश कंदील स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस श्रद्धा आरोसकर, तिसरे बक्षीस यतीन शेट्ये, तर प्रसाद पाळनी, विवेक गावडे, अजित बगलीं, समर्थ कासकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आपले.
पेडणे मर्यादित रांगोळी स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस अर्जिता परब, तिसऱ्या क्रमांकाचे वेदिका तेली, तर अक्षता सावंत स्नेहश्री कोरगावकर आणि शुभ्र शेट्ये यांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली.
मांद्रे मतदार संघ मर्यादित पोहे आणि फराळ स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्रगती नाईक, तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सीमा डिसोजा, तर सुरत चारी रेखा कलंगुटकर स्मिता सावंत यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.