Dona Paula Jetty: भुरळ ‘सिंघम’ स्पॉटची; अवघ्या 4 दिवसांची उघडीप, देशी-विदेशींची पावले जेटीकडे

टेकडीचे आकर्षण : पावसाच्या लपाछपीत देशी-विदेशींची पावले जेटीकडे
Dona Paula Jetty
Dona Paula JettyDainik Gomantak
Published on
Updated on

Dona Paula Jetty राज्यात काही दिवसांपासून अनियमित पाऊस पडत आहे. मात्र, पावसाने दडी मारताच ऊन पडल्याने पणजीतील दोनापावला जेटी या पर्यटनस्थळावर पर्यटकांची भारी गर्दी दिसून येत आहे.

देशी-विदेशी पर्यटक मोठयाप्रमाणात दोनापावला जेटी आणि टेकडीवर जाऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.दोनापावला जेटी आणि तेथील टेकडी हे देशी- विदेशी पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. गेली अनेक दशके देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून तसेच प्रदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट देतातच.

Dona Paula Jetty
Goa Monsoon 2023: गोव्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा काय?

काही दिवसांपासून राज्यात अत्यंत कमी पाऊस पडत असल्याने ऊन आहे. दोनापावल जेटी येथे याच कारणामुळे अनेक पर्यटक अरबी समुद्राचे आणि टेकडीवरून नयनरम्य दृश्य बघण्यासाठी एकच झुंबड उडत आहे.

राजेंद्र कुमार बस्सी या हरियाणाच्या पर्यटकाने सांगितले की, गोव्यात ते एका मित्राला भेटायला सहकुटुंब आले होते. तेव्हा त्यांच्या मित्राने दोनापावल हे पर्यटन स्थळ त्यांना सुचवले. बस्सी यांच्या पत्नी सुभद्रा यांनी सांगितले की, चांगले ऊन असल्यामुळे आम्हाला सहकुटुंब इथे भेट देता आली. इथे ‘सिंघम’चे शुटींग झाल्याचे आम्हाला समजले, म्हणून मुद्दाम हे ठिकाण पहायला आलो,असे त्या म्हणाल्या.

तेथील सेक्युरिटी गार्डने सांगितले की काही दिवसांपासून रोज इथे हजाराहून जास्त पर्यटक भेट देत आहेत. तिथल्याच तिकिट काउंटर वरील व्यक्तीला विचारले असता त्याने सांगितले,की रविवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत एकूण १४७ तिकिटांचा खप झाला होता.

पर्यटकाला प्रत्येकी ५० रुपये आणि मुलांना प्रत्येकी २५ रुपये शुल्क द्यावा लागतो. एक तिकिटावर एक किंवा अनेक लोक त्यांचे तिकीट शुल्क देऊन या जेटीवर जाऊ शकतात.

गोवेकरांना फक्त इथे येण्यासाठी कुठला शुल्क द्यावा लागत नाही. तरीही त्यांना आपले गोवेकर असल्याचे कागदपत्र करावे लागते. गाईड सेठी म्हणाले,पर्यटक फिश करीसाठी स्थानिक हॉटेल्सना भेट देतात.

Dona Paula Jetty
CM Pramod Sawant: करिअरसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे स्पष्टीकरण, म्हणाले, 'हिंदी भाषा शिकणाऱ्यांना...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com