Panjim News: भाटलेतून चार दिवसांनंतर वाहतूक सुरु होणार!

Panjim News: भाटलेत रस्त्याच्या खालून मलनि:स्सारणाची वाहिनी टाकण्यासाठी ड्रिलिंग केले जात होते.
Panjim News | Bhatlem
Panjim News | Bhatlem Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: पणजी-भाटले येथे गेल्‍या बुधवारी सायंकाळी फुटलेल्या जलवाहिनीमुळे चार दिवस वळविलेली वाहतूक रविवारी अर्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्‍याने पूर्ववत झाली. अजूनही खड्डा भरून त्यावर पेव्हर्स बसविण्याचे काम बाकी असल्याने ते आज करण्यात येणार असल्याचे कंत्राटदाराने सांगितले.

भाटलेत रस्त्याच्या खालून मलनि:स्सारणाची वाहिनी टाकण्यासाठी ड्रिलिंग केले जात होते. बुधवारी हे काम सुरू असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे सांतआंद्रे, सांताक्रुझ व पणजीतील काही भागातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. शिवाय जलवाहिनी फुटल्याने भाटले परिसरातील रस्ता जलमय झाला. बाजूच्या घरांत पाणीही गेले होते.

Panjim News | Bhatlem
Goa Education : आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार; नियमावली जाहीर

जलवाहिनी फुटल्याचे समजताच सार्वजनिक बांधकाम खात्याने या मार्गावरील वाहतूक बंद केली. रात्री उशिरा वाहिनी बदलण्याचे कामही हाती घेतले तेव्हापासून या मार्गावरील कदंब बसस्थानक किंवा सांताक्रुझमधून येणारी वाहने मळा, आल्तिनो, मारुती मंदिरमार्गे, ताळगाव व तांबडी माती येथून कदंब स्थानकाकडे किंवा सांताक्रुझकडे जाणारी वाहने भाटले, आल्तिनो ते मारुती मंदिर आणि मळा अशी सोडण्यात येत होती.

चार दिवस वळसा घालून ये-जा करावे लागत असल्याने वाहनधारकांची चांगलीच कसरत झाली. आजपासून खड्डयावर आणखी माती टाकून पेव्हर्स बसविण्याचे काम केले जाईल, असे कंत्राटदाराने सांगितले. रविवारी हे काम होणार होते, परंतु खड्डयातील माती ओली असल्याने ते काम हाती घेतले नाही, असे सांगण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com