Aguada Fort: आग्वाद किल्ल्यावर संगीत-नृत्य महोत्सवात 'कुडियाट्टम' नृत्याने रसिक मंत्रमुग्ध

Aguada Fort: या महोत्सवाचे आयोजन 'इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस्'तर्फे करण्यात आले होते.
Aguada Fort | Koodiyattam
Aguada Fort | Koodiyattam Dainik Gomantak
Published on
Updated on

Aguada Fort: निसर्गरम्य मांडवी नदीच्या किनारी एकेकाळचा जुलमी राजवटींचा साक्षीदार असलेल्या आग्वाद किल्ल्यावरील तुरुंग परिसराने सध्या मुक्ततेचा श्‍वास घेतला आहे. तुरुंग परिसरातील एकेकाळच्या भीतीदायक वातावरणात काल नृत्य आणि संगीताचे झंकार उमटले.

त्यामुळे या परिसराने खऱ्या मुक्तीचा अनुभव घेतला नसेल तरच नवल. निमित्त होते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस्’ने आयोजिलेल्या संगीत आणि नृत्य महोत्सवाचे.

इतिहास, वास्तुकला, संस्कृती, सौंदर्य याची भरभरून उधळण झालेल्या आग्वादात आज नृत्य आणि संगीताचे अप्रतिम सुरांचे झंकार उमटले आणि उपस्थित मने काही काळ मोहरून उठली, शहारली. निळ्याशार पाण्याच्या साक्षीने संगीताचे जलतरंग उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले.

‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस्’च्या स्मृती अमृत मालिकेअंतर्गत भारती बंधू यांच्या कर्णमधुर अशा कबीर भजनांनी आसमंतात संगीताचे सूर उमटले. त्यानंतर प्रख्यात नृत्यांगना कपिला वेणू यांच्या ‘कुडियाट्टम’ नृत्याने पैजणांचे झंकार उमटले.

कार्यक्रम संपताच इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस् तसेच कार्यक्रमाचे प्रायोजक असलेल्या ‘स्पिक मॅके’तर्फे सर्व कलाकारांचा व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. ‘स्पिक मॅके’च्या संयोजक रश्‍मी मलिक तसेच इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टसतर्फे याप्रसंगी कलाकारांना मानवंदना देण्यात आली.

Aguada Fort | Koodiyattam
Goa Liberation Day 2022: 'गोल्डन गोवा'; राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांनी गोमन्तकीयांना दिल्या मुक्तिदिनाच्या शुभेच्छा

‘आग्वाद’ला पर्यटनस्थळाचा आयाम

एकेकाळी कुख्यात असलेल्या आग्वाद तुरुंगातील कैद्यांचे कोलवाळ तुरुंगात स्थलांतर झाले आणि हा परिसर खऱ्या अर्थाने कैदी, तुरुंगाधिकारी, अनन्वित छळ, ऐतिहासिक जुल्मी कथा यांच्या दडपणातून मुक्त झाला. सध्या या किल्ल्याची निगा आणि संवर्धनाचा ध्यास सरकार आणि स्वयंसेवी संघटनांनी घेतला आहे. किल्ल्याचा ढाचा, इमारतींचा मूळ वारसा, वास्तुशिल्पाचा बाज कायम राखून हा परिसर राज्यातील मुख्य पर्यटन स्थळ बनू लागला आहे.

...आणि रसिक-श्रोतेही गहिवरले

‘कुडियाट्टम’ हा केवळ भारतच नव्हे, तर मुद्रा अभिनयातील जगभरातला प्राचीन प्रकार आहे. नृत्याचा हा प्रकार सादर करताना नृत्यांगना कपिला वेणू यांच्या नेत्रांमधून सतत अश्रू वाहत होते. श्रोते-रसिकांनाही यावेळी गलबलून आले. वेणू यांच्यावरची नजर क्षणभरही ढळत नव्हती. नृत्य संपले तसे सर्वांनी जागेवरून उठून त्यांना मानवंदना दिली. तत्पूर्वी आयोजकांनी कबीर भजन आणि ‘कुडियाट्टम’ नृत्याविषयी रसिकांना थोडक्यात माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com