Goa News: सुमार काजूविक्री ‘पणन’ च्‍या स्‍कॅनरखाली

Goa News: गोवा ब्रॅण्ड जपणार : नवी नियमावली, जागृतीवर भर; 18 रोजी बैठकीत शिक्‍कामोर्तब
Goa News | Cashew
Goa News | CashewDainik Gomantak

Goa News: गोव्‍यात उत्तम दर्जाचे काजूगर मिळतात, अशा लौकिकाला अवघ्‍या काही दुकानदारांमुळे डाग लागू नये, म्‍हणून जेथे बनावट व सुमार दर्जाची काजू विक्री करणाऱ्या आस्‍थापनांवर कडक कारवाईसाठी सरकार पावले उचलत आहे.

त्‍यासाठी गोवा राज्य पणन महामंडळही सक्रिय होत असून, येत्या 18 नोव्‍हेंबरला होणाऱ्या बैठकीत काजूसह अन्य 26 पदार्थांची तपासणी व पॅकिंगविषयक माहिती देणे बंधनकारक करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

महामंडळाला पुन्हा अधिकार मिळाल्याने आमच्या पथकाने तपासणी व कारवाईसाठी सज्‍जता ठेवली आहे. ज्या 27 वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात, त्यासाठी महामंडळाचा विक्री व्यवसाय परवाना आवश्‍यक आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्‍यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली.

वेळीप म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि गोवा काजू घेऊन जातात. परंतु, सुमार दर्जाच्‍या काजू बियांची अनेक व्यापारी विक्री करताना दिसतात. यासंदर्भात 18 तारखेला महामंडळाची मडगावात बैठक होणार आहे.

  • पणन महामंडळाने सर्व काजू विक्रेत्यांना परवाना घेण्याचे आवाहन केले आहे. शिवाय काजू विक्रीसाठी काही नियम व अटींचाही समावेश करण्‍याचा विचार आहे.

  • पॅकिंग केल्या जाणाऱ्या पिशवीवर काजू कोठून आणला? कोणत्या कंपनीत त्यावर प्रक्रिया केली? त्याशिवाय इतर काही माहिती असणे अनिवार्य असेल. याची लवकरच अंमलबजावणी होईल.

जागृती करणाऱ्या फलकांचा विचार

गोव्याचा काजू म्हणून ओळख निर्माण व्हावी, यासाठी काही केंद्रांवर गोव्याचा काजू मिळेल, असे जागृती करणारे फलक लावता येतील काय, याचाही पणन महामंडळ विचार करीत आहे. जे व्यावसायिक महामंडळाच्या अटीनुसार दर्जेदार काजू विक्री करतील, त्यांच्याकडून महामंडळ एक टक्का विक्री कर आकारणार आहे.

तसेच काजूच्या किमतीवरही नियंत्रण ठेवणे शक्य होईल. महामंडळाचे वाळपई, पेडणे, म्हापसा, साखळी, कुडचडे, काणकोण, फोंडा येथे यार्ड आहेत. तेथे व्यावसायिकांसाठी लागणारा परवाना दिला जातो.

"सत्तरी, फोंडा, डिचोली, सांगे, केपे, सासष्टी, धारबांदोडा, काणकोण येथील शेतकऱ्यांकडून काजूगर खरेदी केले जातात. आमची संस्था तुर्कीवाडी आणि मंगळुरूच्या कंपनीकडे प्रक्रियेसाठी काजू पाठविते. तेथून आलेला काजू गोवा ब्रँडने देशात व देशाबाहेर पाठविला जातो."

- प्रकाश वेळीप, अध्यक्ष, आदर्श कृषी संस्था.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com