Goa Liberation Day: गोवा विकासाच्या नव्या वाटेवर; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

गोवा मुक्तीदिन सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन
Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak
Published on
Updated on

१९६१ साली गोवा मुक्त झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने गोव्याच्या विकासात आपल्या परीने भर घातली असली तरी सध्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गोव्याला विकासाच्या नव्या वाटेवर नेले आहे असे मत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त केले.

Nilesh Cabral
अर्जुन कपुर,नसिरुद्दीन शाह आणि तब्बु यांच्या 'कुत्ते' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

आज मडगाव येथे गोवा मुक्तीदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तिरंगा ध्वज फडकावून पोलिसांची मानवंदना स्वीकारली. यावेळी आमदार आलेक्स सिकेरा, रेजीनाल्ड लॉरेन्स, उल्हास तुयेकर, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Nilesh Cabral
Goa Taxi : आता राज्याला बेकायदा दलालगिरीतून मुक्त करण्याची गरज; टॅक्सी लोकार्पणाबाबत पर्यटन मंत्र्यांचा मोठा खुलासा

भारत देश जी -२० देशाची शिखर परिषद भारतात आयोजित करत असून त्यातील काही बैठका गोव्यात होणार असल्याने गोव्यासाठी पर्यटनाची आणखी कवाडे खुली होतील असा विश्वास त्यानी व्यक्त केला. यावेळी सासष्टी तालुक्यातील विविध शाळामधील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com