Romi Konkani: रोमीला राजभाषा कायद्यातून वगळणे हा ख्रिस्‍ती समाजावर अन्‍याय, माजी सभापती कार्दोझ यांचे प्रतिपादन

Goa Official Language: ज्‍यावेळी राजभाषा कायदा अंमलात आला, त्‍यावेळी आपण आमदार नव्‍हतो, अन्‍यथा या कायद्याविरोधात विधानसभेत आवाज उठविला असता, असे कार्दोझ म्‍हणाले.
Romi Konkani Goa
Goa Official LanguageDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्‍याची राजभाषा कोकणी व्‍हावी या एकाच उद्देशाने ख्रिस्‍ती समाज राजभाषा आंदोलनात उतरला होता. राजभाषा कोकणी होईल आणि आपल्‍याला ज्ञात असलेल्‍या रोमी कोकणीतून व्‍यवहार करता येतील अशी या समाजाची भावना होती.

पण या समाजाला अंधारात ठेवून राजभाषा कायद्यात फक्‍त देवनागरी लिपीला स्‍थान देण्‍यात आले. हा निर्णय म्‍हणजे सर्व ख्रिस्‍ती समाजाचा एकप्रकारे केलेला घातच होता, अशी प्रतिक्रिया माजी सभापती आणि कोकणी चळवळीतील नेते तोमाझिन कार्दोझ यांनी व्‍यक्‍त केली.

Romi Konkani Goa
Romi Konkani : कोकणी परिषद गप्प का? अ‍ॅड. उदय भेब्रेंचे रोमी कोंकणी समर्थकांवर 'टिकास्त्र'

राजभाषा कायद्यात रोमी लिपीलाही स्‍थान असावे अशी मागणी अलीकडे होत आहे. यासंदर्भात कार्दोझ म्‍हणाले की, ख्रिस्‍ती समाजाने राजभाषा आंदोलनात आपले सर्वस्‍व दिले. काहींनी तर बलिदानही दिले. कोकणीला अधिकृत दर्जा मिळावा यासाठी हा सर्व त्‍याग होता. मात्र या समाजाचे कुठलेही मत राजभाषा कायद्यावेळी विचारात घेतले नाही.

Romi Konkani Goa
Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

१९८७ साली गोव्‍यात राजभाषा कायदा संमत झाला. त्‍यापूर्वी झालेल्‍या आंदोलनात कार्दोझ हे सक्रिय होते. त्‍यानंतर विधानसभा निवडणुकीत कार्दोझ हे कळंगुट मतदारसंघातून निवडून आले होते.

ज्‍यावेळी राजभाषा कायदा अंमलात आला, त्‍यावेळी आपण आमदार नव्‍हतो, अन्‍यथा या कायद्याविरोधात विधानसभेत आवाज उठविला असता, असे कार्दोझ म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com