Goa Mud Festival : फोंड्यात विठ्ठलाच्या गजरात चिखलकाला

Goa Mud Festival : या चिखलकाल्यात अनेक खेळप्रकार खेळले जातात. हा चिखलकाला पाहण्यासाठी रस्त्याच्या दूतर्फा दर्शकांची मोठी गर्दी होते.
Goa Mud Festival
Goa Mud FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा, ‘जय विठ्ठल... हरी विठ्ठल’चा गजर करीत वरचा बाजार फोंड्यातील विठोबा मंदिरासमोरील प्रांगणात चिखलकाला काल उत्साहात साजरा झाला. फोंड्यातील आबालवृद्धांनी या चिखलकाल्यातील विविध खेळ प्रकारांत मनसोक्त भाग घेतला.

फोंड्यातील हा चिखलकाला प्रसिद्ध असून आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा चिखलकाला खेळला जातो. येथील विठोबा मंदिरात आषाढी एकादशी उत्सवावेळी दुपारी भजनी सप्ताहाचे आयोजन केले जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी या भजनी सप्ताहाची सांगता केली जाते. त्यानंतर संध्याकाळी चिखलकाला होतो.

या चिखलकाल्यात अनेक खेळप्रकार खेळले जातात. हा चिखलकाला पाहण्यासाठी रस्त्याच्या दूतर्फा दर्शकांची मोठी गर्दी होते.

Goa Mud Festival
B 32 Muthal 44 vare : ब्रा साईज पाहणाऱ्यांच्या कानाखाली वाजवणारा विद्रोही मल्याळम चित्रपट माहितेय का?...

रस्त्याच्या बाजूलाच विठोबा मंदिर असल्यामुळे वाहनचालकही वाहने थांबवून या चिखलकाल्याची मजा घेतात. वाहतूक पोलिस यावेळेला चोख वाहतूक व्यवस्था ठेवत असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळली जाते. यंदाही हा चिखलकाला उत्साहात आणि दर्शकांच्या मोठ्या उपस्थितीत खेळला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com