Goa Monsoon : मॉन्सून आगमनामुळे खरीप हंगामाला जोर; पेरणीची लगबग

Goa Monsoon : ; बळीराजा लागला कामाला भातशेतीसह भाजीपाला, कणगी, अळूमाडीचीही लागवड
Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak

Goa Monsoon :

पणजी, राज्यात यंदा वेळेत मॉन्सून दाखल झाल्याने नांगरणीची कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये आता पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

राज्यात खरीप हंगामात सुमारे २२ हजार ५६९ हेक्टर क्षेत्रफळावर भातशेती केली जाते, तर सुमारे २,९४२ हेक्टर क्षेत्रफळात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करण्यात येते. राज्यातील ग्रामीण भागात तसेच ताळगावसारख्या प्रगत शहरी भागातदेखील मोठ्या प्रमाणात भातशेती तसेच पावसाळी भाज्यांची लागवड करण्यात येते.

पावसाळ्यात भातशेती, भाजीपाला त्यासोबत मोठ्या प्रमाणात कणगी लागवडही केली जाते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काटेकणगी, नागरचिणी, करांदे यांची लागवड करण्यात येते. त्यासोबत पावसाळी भेंडी, दोडकी, काकडी, चिबूड तसेच अळूमाडी लागवडीला सुरवात झाली आहे. पाऊस सुरू असला तरी अधून-मधून ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे पूर्ण करण्यास मदत होत आहे.

Goa Monsoon
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

१,५०० टन खत वितरित करणार

राज्यात खरीप हंगामात सुमारे २५ हजार व त्याहून अधिक क्षेत्रफळावर विविध पिकांची लागवड करण्यात येते. खरीप हंगामात प्रामुख्याने भातशेती केली जाते. भाजी पिकविली जाते तसेच नारळी माड, सुपारी माडी आदींची लागवड करण्यात येते. राज्यात शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.

- संदीप फळदेसाई, कृषी संचालक

राज्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे सुमारे ३,५०० ते ४ हजार टन खत लागते. या महिन्यात सुमारे ३१० टन खत शेतकऱ्यांना वितरित केले असून पुढील महिन्यात शेतकऱ्यांना खत जास्त लागणार असल्याने सुमारे १,५०० टन खत वितरित केले जाईल. खत खरेदीसाठी अनुसूचित जाती तसेच जमातीच्या शेतकऱ्यांना गोवा शासनाकडून अनुदान देण्यात येते.

- सत्यवान देसाई, वरिष्ठ अधिकारी, कृषी संचालनालय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com