Goa Monsoon 2023: डिचोली तालुक्‍यात झाडांची पडझड; सर्वत्र पाणीच पाणी

शिरगावात घराची मोडतोड; साखळी, पाळीतही ‘धुमशान’
Goa Monsoon Update 2023
Goa Monsoon Update 2023Dainik Gomantak

Bicholim News: राज्‍यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे. आज शनिवारी डिचोलीत सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे एक घर आणि वॉशिंग सेंटरवर मिळून सात ठिकाणी झाडे कोसळली. या पडझडीत वीज खात्याचे मिळून एक लाखाहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

राज्‍यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज शनिवारी पावसाने कहर करताना डिचोली तालुक्‍याला झोडपून काढले. सकाळपासून सायंकाळपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.

दुपारी पावसाचा जोर कमी झालाय असे वाटत असतानाच सायंकाळी पुन्‍हा पावसाने जोर धरला. त्‍यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

Goa Monsoon Update 2023
Goa Electricity Problem: काणकोण तालुक्याला वीज खात्याची 84 कोटींची भेट

जोरदार पावसामुळे डिचोलीत नदीनाल्यांचे पाणी वाढले असून, बहुतेक ठिकाणचा भाग जलमय झालेला आहे. गटारेही तुंबली आहेत. डिचोलीसह वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.

असाच पाऊस पडत राहिला तर हातातोंडाशी आलेला भातशेतीचा घास शेतकऱ्यांच्‍यात तोंडातून हिरावला जाण्‍याची श्‍‍यता आहे.

वॉशिंग सेंटरवर कोसळला माड

वडाचावाडा-शिरगाव येथे जना नागवेकर यांच्या घरावर सागवानचे झाड कोसळले. या घटनेत नागवेकर यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.

सायंकाळी साखळी येथे वॉशिंग सेंटरवर माड पडून पत्र्यांची मोडतोड झाली. पाळी येथे पाच ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली. या पडझडीत वीजवाहिन्या तुटल्या. विठ्ठल गावकर, प्रल्हाद देसाई आणि साईनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com