Goa: ज्यादा पैशांसाठी टॅक्सीचालकाकडून महिला प्रवाशाची सतावणूक; हरमल येथील घटना

Goa Miles Driver Harassment: गोव्यात दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक येतात. मात्र याच पर्यटनप्रेमी राज्यात पर्यटकांच्या सतावणूकीच्या घटना सातत्याने समोर येतात.
Goa Taxi Drivers
Goa Taxi DriversDaimik Gomantak
Published on
Updated on

Goa Miles Driver Harassment: गोव्यात दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक येतात. मात्र याच पर्यटनप्रेमी राज्यात पर्यटकांच्या सतावणूकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कधी टॅक्सी चालक थोड्या थोडक्या अंतरावर जाण्यासाठी जास्त पैसे मागून सतावणूक करतो. तर कधी समुद्रकिनारी महिला प्रवाशांना छळलं जातं.

सध्या गोव्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गोवा माईल्सचा टॅक्सीचालक जास्त पैसे मागून महिला प्रवाशाची सतावणूक करत असल्याचा आहे. मंगळवारी (8 जुलै) हरमल येथे ज्यादा पैशांसाठी टॅक्सीचालकाने महिला प्रवाशाची सतावणूक केली. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महिलेला काहीसा दिलासा मिळाला.

काय आहे नेमकं प्रकरण?

महिला प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, तिने गोवा (Goa) माईल्सच्या दोन कॅब बुक केल्या होत्या. दोघांना आगोदर पैसे दिले होते. मात्र घटनास्थळी पोहोचताच एक टॅक्सीचालक पहिल्यांदा निघून गेला. थोड्यावेळाने तो परत आला आणि तिच्याकडे 200 रुपये ज्यादा देण्याची मागणी करु लागला. एवढचं नाहीतर तिच्यासोबत असलेलं सामान कारमधून काढून रस्त्यावर ठेवलं. त्याचवेळी, दुसऱ्या टॅक्सीचालकाने त्याला पळवून लावलं. तो तिचे 200 रुपये घेऊन निघून गेला.

Goa Taxi Drivers
Goa Accident: लोकल बसची दुचाकीला धडक, तरूणाचा जागीच मृत्यू; गिरी-म्हापसा महामार्गावर घडला अपघात

काही दिवसांपूर्वी, कळंगुटमध्ये टॅक्सीचालकांनी हरियाणा येथील दोन पर्यटकांची अशीच लुबाडणूक केल्याची घटना समोर आली होती. पोलिस तक्रारीनंतर कळंगुट पोलिसांनी या दोन्ही टॅक्सीचालकांना ताब्यात घेतले होते. पर्यटनप्रेमी गोव्यात अशाप्रकारच्या घटना अशोभनीय आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com