
पणजी: राज्याने आरोग्यसेवेत नवा मानदंड प्रस्थापित केला असून अवयवदान उपक्रमांत मोठी प्रगती साधली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाने (गोमेकॉ) २१ वे यशस्वी ‘लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट’ करून राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. वडिलांनी आपल्या मुलाला मूत्रपिंड दान केले आणि दोघांची प्रकृतीही उत्तम असून ते पूर्णपणे बरे होत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील अवयवदान उपक्रमांनी राज्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना जीवनात संजीवनी लाभत असून, गोवा अवयवदानाच्या क्षेत्रात देशातील अग्रेसर राज्यांपैकी एक बनले आहे.
२०११ तव २०२४ पर्यंत एकूण २१ जणांनी लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट केले आहे. त्याव्यतिरिक्त महाविद्यालयात ९ रोग प्रत्यारोपण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेसह दाता आणि प्राप्तकर्त्याची शस्त्रक्रिया, सर्व पूर्वतयारी तपासण्या, एचएलए टेस्टिंग आणि प्रतिरोधक औषधांचे वितरणही पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे. ‘सोटो’ मार्फत केंद्राच्या ‘नोटो’ च्या सहकार्याने अवयवदानाला प्रोत्साहन देण्याचे विशेष प्रयत्न केले जात आहेत.
२०१९ मध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (Goa Medical College) अवयवदान प्रक्रियेला सुरुवात केली होती. त्यानुसार आजपर्यंत महाविध्यालयत एकूण ५ अवयव दात्यांनी अवयवदान केले आहेत. महाविद्यालयात अवयवदान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
‘सोटो’च्या संयुक्त संचालक डॉ. प्रीती यांनी दिलेल्या माहितीनुसार एक ‘ब्रेन डेड’ झालेला रुग्ण ८ लोकांना जीवदान देऊ शकतो तर लिव्हिंग डोनर एका व्यक्तीला जीवदान देऊ शकतो. ज्या रुग्णाचा ‘ब्रेन डेड’ होतो त्याचे सर्व अवयव काम करत असतात, त्यामुळे तो कुणालाही जीवदान देऊ शकतो. लिव्हिंग डोनरमध्ये रुग्ण जिवंत असल्याने तो केवळ मूत्रपिंड दान देऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.