Goa Medical College मध्ये ‘रोबोट’ने केली गुडघ्यावर शस्त्रक्रिया, रोबोटीक शस्त्रक्रिया करणारे GMC देशात प्रथम

दुसऱ्याच दिवशी चालू लागला रुग्ण : सरकारी इस्पितळांच्या गटात देशपातळीवर गोवा अव्वल
Goa Hospital | Goa Medical College Hospital
Goa Hospital | Goa Medical College HospitalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Medical College बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या अस्थिव्यंग विभागाने रोबोट हाताचा वापर करून मडगावातील ६७ वर्षीय रुग्णाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

अचूक अशा या शस्त्रक्रियेमुळे दुसऱ्याच दिवशी रुग्णाला चालणे शक्य झाले.

देशात अशी शस्त्रक्रिया करण्यात सरकारी इस्पितळांच्या गटात गोमेकॉने प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

Goa Hospital | Goa Medical College Hospital
गोव्यातील आमदारांच्या पगारात मोठी वाढ; गृह कर्ज, वाहन खरेदीसाठी 40 लाख तर दरमहा 500 लीटर मोफत पेट्रोल

अवघ्या 45 मिनिटांत शस्त्रक्रिया

केवळ 45 मिनिटांत चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया झाली. रक्तस्रावही अल्पसा झाला. शस्त्रक्रियोत्तर उपचारांची आवश्यकता नसल्याने रोबोट हाताच्या अचूक कामगिरीचे दर्शन घडले.

गुडघा संधिवातावरील ही शस्त्रक्रिया होती. या शस्त्रक्रियेमुळे अस्थिव्यंग आणि पाठीचा कणा उपचारांत क्रांती होईल, असे राणे यांचे म्हणणे आहे.

गोमेकॉही घेणार रोबोट : जगात रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू झाल्या असून गोमेकॉही रोबोटची खरेदी करेल. येथे अशी उपकरणे वापरण्याची क्षमता आहे, असे बांदेकर म्हणाले.

या शस्त्रक्रियेवेळी डॉ. बांदेकर यांचे पुत्र अभिषेक बांदेकर, डॉ. अनिश वेर्णेकर, डॉ. नंदिनी फडते, भूलतज्ज्ञ डॉ. शर्मिला बोरकर, परिचारक विष्णू यांनी साहाय्य केले.

Goa Hospital | Goa Medical College Hospital
Goa University Championship: डॉन बॉस्को अभियांत्रिकी उपविजेते, भास्कर गैनला ‘लोहपुरुष’ किताब

रोबोट हाताची अशी आहे खासियत!

  • अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख तथा गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी ही शस्त्रक्रिया केली.

  • ते म्हणाले की, मी मुलीच्या पदवीदान सोहळ्यासाठी अमेरिकेत गेलो असता, तेथे त्यांनी रोबोट हाताने शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे लक्षात आले.

  • अमेरिकेतील कंपनीने शस्त्रक्रिया करण्यासाठी हा रोबोट हात गोमेकॉला उपलब्ध करून दिला आहे.

  • मंगळवारी त्यांच्या रोबोट अभियंत्याने इतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि भोजनोत्तर सत्रात ही शस्त्रक्रिया केली.

  • अशा रोबोट हाताची किंमत सहा कोटी रुपये आहे.

  • गोमेकॉने हा रोबोट हात खरेदी केलेला नाही.

  • या कंपनीच्या सौजन्याने वापरण्यास मिळाला आहे.

  • रोबोट स्वत: शस्त्रक्रिया करत नाही. तो डॉक्टरांना चालवावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com