Margao Municipality: मडगावात बांधकाम परवाना शुल्क वाढणार

पालिकेची 25 रोजी बैठक: निवासी बांधकाम करणाऱ्यांना बसणार फटका
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Residential Building Permit Fees मडगाव नगरपालिकेची बैठक 25 रोजी निश्र्चित केली असून बैठकीत बांधकाम परवाना शुल्कात वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नगरपालिका निवासी बांधकामाच्या साधन सुविधा, मालमत्ता शुल्कातही वाढ करण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे निवास बांधकाम करणाऱ्यांना फटका बसणार आहे, असे शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो याचे मत आहे.

मडगाव नगरपालिका क्षेत्रामध्ये जी बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सरकारने नगरपालिकेला दिले आहेत. मात्र नगरपालिका या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कुतिन्हो यांनी केला आहे.

Margao Municipality
CM Pramod Sawant: स्थानिकांना भडकवण्याचं काम रेती व्यावसायिकांच, मात्र पाण्यासाठी बंधारा आवश्यकच

सरकारने यापूर्वीच म्हणजे 2020 साली बांधकाम परवाना शुल्कात वाढ केलेली आहे. आता प्रस्तावित वाढ ही 45 टक्क्याची असणार आहे. नगरपालिकेने स्वच्छता शुल्कातही 50 टक्के वाढ केली आहे. नगरपालिका बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष का करीत आहे, हा प्रश्र्न आपणासह इतर नागरिकांनाही पडलेला असल्याचे कुतिन्हो याचे म्हणणे आहे.

Margao Municipality
Goa Education News: वैद्यकीय शिक्षणाकडे गोव्याच्या विद्यार्थ्यांचा कल कमी?; NEET-UG साठी सर्वाधिक अर्ज महाराष्ट्रातून

नगरपालिका बांधकामाच्या पायाक्षेत्रफळाप्रमाणे शुल्क वाढविणार असल्याचे कळते. त्यामुळे आता १०० चौरस मीटर निवासी बांधकामासाठी परवाना शुल्क ६७६१४ वरून ९३३०७ रुपये वाढणार आहेत.

तसेच व्यापारी संकुलासाठी परवाना शुल्क १०० चौरस मीटरसाठी ७६९१६ वरून १, ११, ५३० रुपये एवढे वाढणार आहेत. ज्या इमारतींमध्ये लिफ्ट आहे. त्यांना ८२२८२ रुपये जादा शुल्क भरावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com