Chorla Ghat: चोर्ला बेळगाव रस्त्यावर अपघात; चार तासांनी वाहतूक सुरळीत

Chorla Ghat: ही दोन्ही वाहने कर्नाटक पासिंगची असल्याचेही समजले आहे.
Chorla Ghat
Chorla GhatDainik Gomantak
Published on
Updated on

Chorla Ghat: सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास चोर्ला बेळगाव रस्त्यावर अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ही दोन्ही वाहने कर्नाटक पासिंगची असल्याचेही समजले आहे.

रेल्वे विभागाच्या डबलिंग कामासाठी अनमोड घाट मार्ग 5 ते 25 जानेवारीपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने बेळगांव कडे जाणारी सर्व अवजड वाहनांची वाहतूक सध्या चोर्ला घाटातून जात आहे.

Chorla Ghat
Karate Championship: उत्तर गोवा जिल्हा कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र घाटात मधोमध घडलेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजुनी वाहतुक कोंडी झाली होती.

दरम्यान सोमवारी पहाटे 4 वाजल्यापासून ते सकाळी 8 पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडल्याने वाहनचालकांना मनस्तात सहन करावा लागला.

साधारणतः सकाळी 8 नंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती मिळली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com