
अंजुना पोलिसांनी गुरुवारी पहाटे अंजुना येथील रॉकी गॅरेजजवळ मोठा छापा टाकला आणि तिथून १९ वर्षीय बापी मंडलला अटक केली. आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. पोलीसांनी तपासादरम्यान बापी मंडलच्या ताब्यातून सुमारे ३ किलो गांजा जप्त केला, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे ३ लाख रुपये आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून १.५८ लाख रुपयांची रोकड देखील हस्तगत करण्यात आली.
आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी स्पर्धेत ८ संघ सहभागी होत आहेत, ज्यांना २ गटात विभागण्यात आले आहे. गट-अ मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमानचे संघ आहेत, तर गट-ब मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँगचे संघ आहेत.
एएफसी आशियाई कप २०२७ च्या अंतिम फेरीतील पात्रता गट क मधील यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी गोव्यातील मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे.
कुळे येथे मुस्लिम बांधवानी जुलुस उत्सवसाठी रॅली काढण्यास मागितलेली परवानगी अखेर जिल्हाधिकारी यांनी नाकारली.यापूर्वी कुळे शिवसाम्राज्य व बजरंग दल यांनी रॅलीला विरोध दर्शविला होता. कुळे गावात आम्ही अन्य दिवशी शांततेत रॅली काढणारच, असा दावा मुस्लिम बांधवांनी केलाय.
मासेमारी करण्यासाठी गेलेली होडी वागातोर येथील खवळलेल्या समुद्रात उलटून बुडाली. या होडीत असलेल्या राज चोडणकर (शिवोली), आकाश एक्का व संजय सेक्का (छत्तीसगढ) यांनी वेळीच समुद्रात उड्या घेत मदतीसाठी आरडाओरडा केला.
बिट्स पिलानीमध्ये आणखी ऋषी नायर या विद्यार्थ्याने संपवले जीवन. वर्षभरातील एकूण पाचवी घटना.
४, ५ सप्टेंबर रोजी हवामान खात्याने राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
करूळ घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित रस्ता विभागाला हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी १० दिवसांचा अवधी दिला असून रस्त्याची सर्व कामे पूर्ण करून येत्या १५ सप्टेंबरपासून अनमोड मार्गे रस्ता अवजड वाहनांसाठी खुला करणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी सांगितले.
पणजीतील जुना हायकोर्ट इमारतींना सील केल्याप्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने गोवा सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. न्यायालयाने सरकारला सुनावले, “तुम्हाला हायकोर्टच्या इमारतीत शिरण्याचा किंवा तिला कुलूप लावण्याचा काहीही अधिकार नाही.”
जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.