Goa News: मानवी तस्करीच्या छाप्यांमध्ये तीन महिलांची सुटका, चार जण गजाआड; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest News Today 1 September 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa News: मानवी तस्करीच्या छाप्यांमध्ये तीन महिलांची सुटका, चार जण गजाआड; वाचा दिवसभरातील घडामोडी
Bank Robbery Dainik Gomantak
Published on
Updated on

मानवी तस्करीच्या छाप्यांमध्ये तीन महिलांची सुटका, चार जण गजाआड!

गोवा पोलिसांनी मानवी तस्करीच्या छाप्यांमध्ये तीन महिलांची सुटका केली, कोलवा आणि फोंडा येथे चार आरोपींना अटक

पर्यावरणपूरक 'निर्माल्य' उपक्रमाने म्हापसा येथे गणेश चतुर्थीचे औचित्य साधले

पर्यावरणपूरक 'निर्माल्य' उपक्रमाने म्हापसा येथे गणेश चतुर्थीचे औचित्य साधले. यावर्षी म्हापसा येथे गणेश चतुर्थीच्या उत्सवात पर्यावरणाचे रक्षण करताना शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने निर्माल्य कलश उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक प्रयत्नांना चालना मिळाली.

कोळसा हाताळणी वाढवणार नाही!

राज्यात कोळसा हाताळणीची क्षमता वाढवली जाणार नाही : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री हॉस्पेट-तिनईघाट रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केंद्राने केल्यानंतर दुपदरीकरणाचा घाट कोळसा हाताळणी वाढवण्यासाठीच घातल्याचा विरोधकांनी केला होता आरोप

पाणीपुरवठ्याबाबत समन्वयाची कोणतीही समस्या येणार नाही

पाणीपुरवठ्याबाबत समन्वयाची कोणतीही समस्या येणार नाही. आम्ही एकत्र काम करू.आम्ही गोव्यातील लोकांना चांगली सेवा देऊ असे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले

मशिदीच्या कुंपणावरून डिचोलीत वाद

मशिदीच्या कुंपणावरून डिचोलीत वाद. कुंपणाची मोडलेली भिंत बांधून द्या. आझाद जामा मशीद समितीची मागणी. अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा हातात घेणार असल्याचा दिला इशारा

गोवा-बेळगाव महामार्गावरील जांबोटी येथे ट्रक कलंडल्याने वाहतुकीवर परिणाम

गोवा - बेळगाव मार्गावरील चोर्ला मार्गावर जांबोटी जवळ असलेल्या कलमनी येथे मुख्य रस्त्यावर एक ट्रक पलटी, एक रस्त्यावर खचला असल्याने सकाळ पासून गोवा रस्ता बंद, मोठ्याप्रमाणात रस्त्यावर वाहतूक कोंडी प्रवासाचे हाल

परवानगी न घेता बसविण्यात आलेल्या इन्व्हर्टर आणि जनरेटर विरुद्ध कारवाई

वीज खात्याकडून घरात परवानगी न घेता बसविण्यात आलेल्या इन्व्हर्टर आणि जनरेटर विरुद्ध कारवाई निश्चित. निर्णय लोकांच्या हितासाठी - वीज मंत्री सुदिन ढवळीक

बाशुदेव भंडारी प्रकरण; गूढ अजूनही उलगडलेले नाही...

साखळी येथील व्यवस्थापनाचा विद्यार्थी बाशुदेव भंडारी, सेंट एस्टेव्हम फेरीजवळ भाड्याने घेतलेली कार पाण्यात टाकल्यानंतर बेपत्ता झाल्याला एक वर्ष झाले आहे. त्याची महिला मैत्रीण वाचली पण बाशुदेव कधीच सापडला नाही. कारमधून फक्त त्याचा लॅपटॉप आणि बॅग सापडली. खरोखर काय घडले हे कोणालाही माहिती नाही, तो बुडाला की पळून गेला? गूढ अजूनही कायम आहे.

Bicholim: मशिदीच्या कुंपणावरून डिचोलीत वाद

मशिदीच्या कुंपणावरून डिचोलीत वाद. कुंपणाची मोडलेली भिंत बांधून द्या. आझाद जामा मशीद समितीची मागणी. अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती.

Goa Rain: हवामान विभागाकडून 'ऑरेंज' अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जलमय स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील सहा दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे ३ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर १, २, ४, ५ आणि ६ सप्टेंबरसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Rachol Fort: राशोल किल्ल्याच्या अवशेषांच्या जतनाची अभ्यासकांची मागणी

सासष्टीतील राय गावानजीकच्या राशोल गावात राशोल किल्ल्याचे अवशेष सापडतात. त्यांचे जतन करण्याची मागणी इतिहास अभ्यासक करीत आहेत. हा किल्ला बहामनी राजवटीत बांधला होता. नंतर विजयनगरचे सम्राट कृष्ण देवराय यांनी तो जिंकला व नंतर पोर्तुगीजांनी तो काबिज केला.

राज्यात लवकरच ३०० स्वयंचलित कचरा संकलन यंत्रे

गोवा सरकारच्या डीआरएस (डिपोझीट रिफंड स्किम) योजने अंतर्गत अविघटनशील कचरा (नॉन बायोडेग्रेडेबल वेस्ट) संकलन करण्यासाठी एका हैद्राबादस्थित कंपनीला सरकारने कंत्राट दिले आहे. या कंपनीद्वारे गोव्यात ३०० ठिकाणी अविघटनशील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी स्वयंचलित संकलन मशीनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

गोव्यात नव्या 'हायस्पीड' बोटी घालणार गस्त

बंदर कप्तान खात्याने (सीओपी) किनारी भागात गस्त घालण्यासाठी हाय-स्पीड फायबरग्लास पेट्रोल बोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sanguem: उगवे येथे गुलमोहराचे भलेमोठे झाड कोसळले

उगवे येथे मुख्य रस्त्यावर पहाटे साडेदोनच्या सुमारास एक प्रचंड गुलमोहराचे झाड कोसळले, त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. अग्निशामक दलाच्या पथकाने झाड हटवण्यासाठी जवळपास दोन तास प्रयत्न केले. दरम्यान, झाड कोसळल्यामुळे वीजवाहिन्याही तुटल्या, अशी माहिती मिळाली आहे.

Goa Rain: पुढील सहा दिवस राज्‍यात मध्‍यम स्वरूपाचा पाऊस 

पुढील सहा दिवस राज्‍यात मध्‍यम स्वरूपाचा पाऊस कायम राहील असा अंदाज वर्तवत राज्‍य हवामान विभागाने यलो अलर्टही जारी केला आहे. मान्‍सूनचा पाऊस यंदा राज्‍यात अंदाजाच्‍या सुमारे बारा दिवस आधीच दाखल झाला. त्‍यानंतर पुढील काही दिवस हजेरी लावल्‍यानंतर मध्‍यंतरीच्‍या काळात त्‍याने बराचवेळ विश्रांती घेतली होती.

Sangodd Festival: कुंभारजुवेतील सांगोडोत्सव रंगणार मंगळवारी

गोव्यातील कुंभारजुवे गावात दरवर्षी साजरा होणारा सांगोडोत्सव हा एक अद्वितीय जल-उत्सव आहे. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या गणेशोत्सवाचा तो अविभाज्य भाग मानला जातो. मांडवी नदीच्या पात्रात हा उत्सव रंगतो. यंदा मंगळवार २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वा. कुंभारजुवेतील मांडवी नदीच्या पात्रात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीशांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी शेट यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com