Goa News: मुंगुल हल्ल्याप्रकरणी कोर्टाने फेटाळला अमोघ नाईकचा जामीन; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण,क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.
Goa Court Verdict
Goa Court VerdictDainik Gomantak
Published on
Updated on

GCA निवडणुकीत चेतन देसाई आणि विनोद फडके यांच्या पॅनलचा विजय

चेतन देसाई आणि विनोद फडके यांच्या पॅनलने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजय मिळवला, विरोधी पॅनेलचा ६-० असा पराभव केला.

कोलवाळ तुरुंग अधिकाऱ्यांना गहाळ निधी स्पष्ट करण्याचे निर्देश

उपअधीक्षकांना पुरवठादाराकडून मिळालेले ३१,४०० रुपये रोख सवलती कैदी कल्याण निधीत का जमा करण्यात आल्या नाहीत हे स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जून आणि जुलै २०२५ मध्ये खरेदी केलेल्या कॅन्टीनच्या वस्तूंसाठी ही सवलत देण्यात आली होती.

हवामान अपडेट: गोव्यात यलो अलर्ट

आयएमडीने १६ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत गोव्यात यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

बाशुदेव भंडारी प्रकरण; सीबी फाइल्स चार्जशीट

३१ ऑगस्ट २०२४ रोजी बेपत्ता झालेल्या बाशुदेव भंडारी बुडून मृत्यु प्रकरणातील दोघांविरुद्ध गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहे.

प्रभाग फेररचनेचा मसुदा खुला

जिल्हा पंचायत मतदारसंघांच्या प्रभाग फेररचनेचा मसुदा सूचना, हरकतींसाठी आजपासून खुला. जिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालयांत ठेवलेल्या मसुद्यावर येत्या २६ सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील हरकती. राज्य निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी.

महाराष्ट्र सिमेवर पोचलेला हत्ती पुन्हा पेडणेच्या तोर्से या गावात परतला

महाराष्ट्र सिमेवर पोचलेला हत्ती पुन्हा पेडणेच्या तोर्से या गावात परतला, नागरीकांत भितीचे वातावरण शेतकरी हैराण, गायी-बोकडे तीन दिवस झाले रानात सोडता येईना.

मुंगुल हल्ला प्रकरण; न्यायालयाने अमोघ नाईकचा जामीन अर्ज फेटाळला

मडगाव सत्र न्यायालयाने मुंगुल हल्ला प्रकरणातील प्रमुख संशयित अमोघ नाईक (बोरी) याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

अंगणवाडी सेविकांना २ हजार; मदतनिसांना मिळणार १ हजार वाढ

विधानसभेच्‍या गत पावसाळी अधिवेशनात दिलेल्‍या आश्‍‍वासनानुसार महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याने राज्‍यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्‍या मासिक मानधनात वाढ करण्‍यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. सेविकांच्‍या मानधनात प्रत्येकी दोन हजार आणि मदतनिसांच्‍या मानधनात प्रत्‍येकी एक हजार रुपयांची वाढ करण्‍याचा प्रस्‍ताव खात्‍याने सरकारला सादर केला असून, सरकारच्‍या मान्‍यतेनंतर लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती खात्‍याच्‍या सूत्रांनी सोमवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

Mungul: मुंगूल हल्ला प्रकरण; आणखी एक आरोपी अटक

मूंगुल फायरिंग प्रकरणात पोलिसांनी राजेश हेल्माला अटक केली आहे. आतापर्यंत एकूण २५ आरोपींना अटक झाली आहे. एका संशयिता आमोघ नाईक यांनी अग्रिम जामिनाची अर्ज दाखल केली होती, ज्यावर आज सुनावणी होणार आहे.

Anmod Ghat: अनमोड घाट रस्ता सहाचाकींसाठी खुला

काही दिवसांपासून दरड कोसळल्‍यामुळे अवजड वाहनांसाठी बंद असलेला अनमोड घाट आता सहाचाकी वाहनांसाठी खुला करण्‍यात आला आहे. यासंदर्भात दक्षिण गोव्याचे जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिटस यांनी आदेश जारी केला आहे. अनमोड घाटातील वाहतूक ठप्प झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि मालवाहतुकीला मोठी अडचण येत होती. यामुळेच हा निर्णय घेण्‍यात आल्याचे जिल्‍हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com