Goa News: कांदोळी येथील बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास न्यायालयाची परवानगी; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर बातम्या.
Goa Court
Goa Court Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक पोलिसांचा 'नो पार्किंग'मधील वाहनांवर कारवाईचा बडगा

मडगाव वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या बाजूला 'नो पार्किंग' झोनमध्ये पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई केली. सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगसाठी आता या जागेचे योग्यरित्या सीमांकन करण्यात आले असून पोलिसांनी वाहनचालकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

कांदोळी येथील बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास न्यायालयाची परवानगी

कांदोळी येथील किनारी क्षेत्र नियमन नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर संरचनेच्या पाडकामासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाला (जीसीझेडएमए) परवानगी दिली. मात्र, ही परवानगी कठोर अटींसह देण्यात आली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती आशिष एस. चव्हाण यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला.

Ponda Crime: फोंड्यात मारहाण; तिघांना अटक

गणेश टूडू नामक इसमाला जबर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना फोंडा पोलिसांनी अटक केली. त्यात अमय नाईक (मडकई), प्रितेश कामत (दाबोळी) व देवेंद्र शेळपकर (माशेल) या तीन संशयितांचा समावेश आहे. तिघाही संशयितांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Goa Crime: गांजाप्रकरणी वास्कोत तिघांना अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी आज तिघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियांका पाटील पुढील तपास करीत आहेत. वास्को रेल्वे स्थानकाच्या फलाटाजवळ कोणीतरी गांजा घेऊन येणार असल्याचे माहिती मिळाली होती. त्यानुसार काल रात्री ८.५७ ते मध्यरात्री १२.२० या वेळेत वास्को पोलिस तेथे दबा धरून होते. यावेळी तेथे आलेले दिनेश चौहान ऊर्फ गंजू (वाडे - वास्को), सप्नेश्वर गौजा (ओडिशा) यांना गांजासह ताब्यात घेतले.

काणकोणकर यांच्या हल्ल्यामागे कोण आहे? युरींचा सवाल

सरकारशी संबंधित लोकांद्वारे कार्यकर्त्या रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला करणं अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे आपण विचारतो की गोव्यातील लोक खरोखर सुरक्षित आहेत का. हा हल्ला कुणी आखला? यामागील मेंदू कोण आहे? या प्रकरणाची पूर्ण चौकशी होणे आवश्यक आहे. हा प्रकार आम्ही ठामपणे नाकारतो असे युरी आलेमाव म्हणाले.

कर्णबधिर फुटबाॅल स्‍पर्धेत उत्तर गाेवा संघ विजयी

गोवा स्‍पोर्ट्‌स कौन्‍सिल ऑफ डेफ यांनी मडगावच्‍या रुद्र स्‍पोर्ट्‌स क्‍लब यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्‍या सहाव्‍या अखिल गोवा कर्णबधिरांसाठीच्‍या फुटबॉल स्‍पर्धेत विजय मिळविताना दक्षिण गोवा संघावर ३ विरुद्ध शून्‍य गोलनी विजय मिळविला.

Codar IIT: कोडार आयआयटी विरोधात मंत्री तवडकर यांना निवेदन

कोडार येथील आयआयटी विरोधात एसटी समाजातर्फे क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांना निवेदन. लवकरच गावात येऊन पाहणी करण्याचे आश्वासन.

महिला पर्यटकाला मनस्ताप देणाऱ्या 3 टॅक्सीवाल्यांना अटक

ऑनलाईन बुकिंग केलेली टॅक्सी अडवून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील महिला पर्यटकाला नाहक त्रास देणाऱ्या तीन स्थानिक टॅक्सीवाल्यांवर कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

BABLI NAYAK : कोंकणी प्रजेचो आवाज हरपला! बाबली नायक यांचे निधन

कोंकणी भाषेसाठी लढा देणाऱ्या "कोंकणी प्रजेचो आवाज" चळवळीचे नेते बाबली नायक यांचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com