
सावईवेरे भूतखांब पठारावर कोणताही उद्योग आणण्यापूर्वी ग्रामस्थांना विश्वासात घ्या. केरी नागरी कृती समितीची सरकारकडे मागणी. नायलॉन 6,6 आंदोलनाची आठवण करून देत जमीन पुन्हा गावकऱ्यांना देण्या संदर्भात प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आल्याचीही दिली माहिती.
सरकारने एनईपीची अंमलबजावणी करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वेठीस धरले. याआधी एनईपीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. त्यानंतरच सर्व भागधारकांशी चर्चा करुन मगच अंतिम निर्णय घ्यावा, असे आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी म्हटले.
माडानी-पर्रा येथे म्हापसा पोलिसांनी छापेमारी केली. ज्यामध्ये 3 लाखांचा साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय, संशयितांना अटकही करण्यात पोलिसांना यश आले. सुख माझी (21) आणि चंदन सेठी (23) अशी या संशयितांची नावे आहेत. जानेवारी महिन्यात गोवा पोलिसांकडून ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली. तर 13.69 लाखांचा ड्रग्ज जप्त केले.
गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसने आझाद मैदानावर वास्को येथे नुकत्याच घडलेल्या लैंगिक अत्याच्यार पीडितेच्या समर्थनावर शांततापूर्ण आंदोलन केले. महिलांच्या संरक्षणासाठी कराटेचे वर्ग आयोजित करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणार असल्याची कॉंग्रेस कार्यकर्त्यांची माहिती.
डिचोली तालुक्यात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी खंत पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे. आमठाणे जलाशयाची धारण क्षमताही धोक्यातआहे..
फातोर्डा येथे मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयानं आदिल लालसाब अल्गुर, मोहम्मद अली मुल्ला, शहजाद शेख, वीरेश अगुआंडा आणि मोहम्मद शेख यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिरामारमध्ये वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.